ओबीसी नेत्यांवर अन्याय होतो हे सोनिया गांधींच्या लक्षात येतंय, ते महाराष्ट्रातील नेत्यांच्या कसे येत नाही?

महाराष्ट्रात ओबीसी नेत्यांना बदनाम करून राजकारणातून संपवलं जातंय, ओबीसी समाज आंदोलन करणार; सानपांचा इशारा

मुंबई : महाराष्ट्रात ओबीसींवर (OBC leaders) अन्याय होत आहे हे दिल्लीत सोनिया गांधींच्या (Sonia Gandhi) लक्षात येतं ते राज्यातील नेत्यांच्या लक्षात कसं येत नाही, असा संतप्त सवाल ओबीसींचे महत्त्वाचे नेते मानले जाणारे बाळासाहेब सानप (Balasaheb Sanap) यांनी केला आहे.

एवढेच नाही तर, ‘राज्यात ओबीसी समाजातील नेत्यांना बदनाम करून राजकारणातून संपवलं जात आहे.’ असं वक्तव्य बाळासाहेब सानप यांनी बीडमध्ये केलं आहे.

सध्या राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादीचे नेते, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपावरून खळबळ उडाली आहे. या प्रकरणी भाजपने धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत राज्यभर आक्रमक आंदोलने सुरू केली आहेत. तसंच अनेक मोठ्या नेत्यांनी उघडपणे धनंजय मुंडे यांची बाजू घेण्याचं टाळलं आहे. या पार्श्वभूमीवर बाळासाहेब सानप यांचे वक्तव्य महत्त्वाचे ठरते.

तसेच, सानप यांनी आरक्षणावरूनही घणाघात केला आहे. मराठा समाजाची ओबीसी आरक्षणात घुसखोरी होत आहे. केंद्रातील योजना, स्कॉलरशिप, नोकरी यामध्ये ओबीसी समाजाला वंचित ठेवण्याचं षडयंत्र आखलं जात असल्याचे सानप म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER