शिवसेनेच्या बाळासाहेब सानप यांना पक्षात घेण्यास भाजप नेत्यांचाच विरोध

मुंबई : शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार बाळासाहेब सानप ( Balasaheb Sanap) यांच्या संभाव्य भाजप (Bjp) प्रवाशाने गोंधळ निर्माण झाला आहे . माहितीनुसार, सानप यांच्या प्रवेशाआधीच भाजपमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. यामुळे सानप यांना विरोध करण्यासाठी भाजपातील एक गट वरिष्ठांच्या भेटीला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर भाजपने बाळासाहेब सानप यांना पक्षात घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. पण आता भाजपमध्ये सानप यांच्या येण्यामुळे काही नेते नाराज असल्याची माहिती आहे .

राष्ट्रवादीकडून विधानसभा निवडणूक लढवल्यानंतर पराभवाला सामोरे जावं लागल्याने सानप यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. नाशिकच्या महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सानप यांना पक्षात प्रवेश देण्यात आला. शिवाय नाशिक पालिकेतील भाजपच्या सत्तेला सानप सुरुंग लावतील अशी आशा होती. पण त्यात त्यांना अपयश आलं. त्यामुळे सानप हे गेल्या काही काळापासून सक्रिय राजकारणात नव्हते. ते भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चाही सुरू होत्या.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्याने तीन पक्ष एकत्रित निवडणुका लढवणार आहेत. त्यामुळे नाशिक पालिकेतील सत्ता हातातली जाण्याची शक्यता असल्याने सानप यांना आपल्याकडे खेचण्याचा भाजपने प्रयत्न सुरू केला होता.

ही बातमी पण वाचा : भाजपचा अपेक्षाभंग : भाजपच इनकमिंग रोखण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना यश

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER