शरद पवारांना दिलेला शब्द पालकमंत्र्यांनी पाळला

Balasaheb Patil-Sharad Pawar.jpg

सातारा : कोरोनाची (Corona virus) वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी कोविड सेंटरची उभारणी करावी असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले होते. त्यानुसार कराड तालुक्यातील यशवंनगर येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याने सामाजिक बांधिलकी जोपासत १५० बेडच्या कोविड सेंटरची (Covid Center) उभारणी केली आहे. येत्या दोन दिवसात हे सेंटर शासनाकडे हस्तांतरित करण्यात येणार

सह्याद्री कारखाना कार्यस्थळावर सह्याद्री कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात या सेंटरची उभारणी केली असून सेंटरच्या उभारणीच्या कामाची पाहणी सहकार व पणन मंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांनी केली. या सेंटरमध्ये १०० रुग्णांकरिता उपचार कक्ष तयार करण्यात आले आहे. ५० रुग्णांसाठी ऑक्सिजनच्या सुविधेसह वेगळा कक्ष उभारण्यात आला आहे. सेंटरमध्ये कारखान्याकडून रुग्णांना पिण्यासाठी गरम पाणी, साबण, टूथ ब्रश, वाफारा मशीन पुरवण्यात येणार आहेत.

सर्वांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा. कोरोनाला न घाबरता सामोरे जावे. भीती बाळगू नये. वेळेत उपचार घेऊन निश्चित बरे होता येते. सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहनही पाटील यांनी केले. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील, जनरल मॅनेजर पी. आर. यादव, सल्लागार एच. टी. देसाई ,बांधकाम अभियंता वाय. जे. खंडागळे, परचेस अधिकारी जे. डी. घार्गे, कायदेशीर सल्लागार जी. व्ही. पिसाळ, व्ही. जे. शेलार, आर. जी. तांबे, उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER