‘अस्तीनीतल्या सापांना दूर ठेवा’ ही बाळासाहेब, पवारांची भूमिका स्वीकारण्याची गरज – संजय राऊत

Sanjay Raut - Balasaheb Thorat - Sharad Pawar - Maharastra Today

मुंबई :- पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याकडून माझ्यावर भाजपमध्ये येण्यासाठी दबाव आणला गेला होता, असा गौप्य्स्फोट राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केला आहे. यावर प्रतिक्रिया देतांना शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज माध्यमांशी बोलताना अश्या अधिकाऱ्यांवर वेळीच कारवाई होणे गरजेचे म्हटले आहे.

दिल्लीत बोलताना संजय राऊत म्हणाले की, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) हे नेहमीच अधिकाऱ्यांवर विश्वास ठेवू नये, असे सांगायचे, शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना आमच्या राज्यात लालफीतशाही नको, असे बजावून सांगायचे. ‘अस्तीनीतल्या सापांना दूर ठेवा’ हीच त्यांची भूमिका असायची. आज जर बाळासाहेबांची भूमिका स्वीकारली असती तर तर आज ही वेळच आली नसती. पोलिस खात्यातील असे चार-पाच अधिकारी आमच्या, शरद पवारांच्या (Sharad Pawar) नजरेत आले होते. त्यांच्यावर विश्वास कसा ठेवला असा सवाल राऊतांनी व्यक्त केला. बाळासाहेबांनीदेखील अधिकाऱ्यांच्या मदतीने सरकार चालविता येत नाही, असे सांगितले होते. युतीसरकारच्या काळातही तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशींना बाळासाहेबांनी दोन अधिकाऱ्यांना सुटीवर पाठविण्यास सांगितले होते, असेही राऊत म्हणाले. वेळीच या अधिकाऱ्यांना बाजुला केले असते तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) ज्या फाईल घेऊन दिल्लीला गेले होते, ते झाले नसते, असेही राऊतांनी सांगितले.

यावेळी ते म्हणाले की, शरद पवारांनीही हीच भूमिका घेतली होती. सरकारी अधिकाऱ्यांना सत्ता स्थापनेवेळी दूर ठेवावे. कोणी चुकी केली तर त्याच क्षणी कारवाई करणे गरजेचे आहे. रश्मी शुक्ला (Rashmi Sukla) यांना त्यावेळी माफ केले ही आमची चूक झाली आहे. मात्र आता अश्या अधिकाऱ्यांवर वेळीच कारवाई केली जाईल, असेही राऊत म्हणाले.

ठाकरे सरकार महाराष्ट्रात (Maharashtra) येत आहे, त्यांच्या सोबत जाऊ नये. तुमच्या फाईल तयार आहेत. यड्रावकरांपासून अनेक आमदारांना रश्मी शुक्ला धमक्या देत होत्या. हे सर्वांना माहिती होते. भाजपा सरकारसोबत जा, असे इशारे पोलीस खात्याकडून दिले जात होते. शुक्लांना महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) सरकारने तरीही ६ महिने पदावर ठेवले होते याचे मला आश्चर्य वाटते, असे राऊत यांनी सांगितले.

सीताराम कुंटेंनी काल एक अहवाल दिला आहे. त्यामध्ये फोन टॅपिंगबाबत मोठे खुलासे आहेत. भाजपाला फायदा होईल, राजकीय फायद्यासाठी हे अधिकारी आमदारांचेच नाही तर खासदार आणि पत्रकारांचेही फोन टॅप करत होते. पत्रकारांना काय माहिती आहे हे त्यांना हवे होते. शरद पवारांचे फोन टॅप केले गेले, ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले. सरकार जे बसलेय त्यांना या गोष्टीचे गांभीर्य समजायला हवे. अधिकाऱ्यांच्या खांद्यावर मान ठेवून राज्य करता येत नाही. ती एपीआयपासून पोलीस अधिऱ्यापर्यंत कशी बगलेत दबली जाते ते पाहिलेय. सरकारने यातून बोध घ्यावा, असा इशारा राऊत यांनी दिला.

ही बातमी पण वाचा : धुळ्यात पुढचा महापौर राष्ट्रवादीचा, भाजपची सत्ता खेचण्यासाठी खडसे ऍक्शन मोडवर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER