बाळासाहेबही म्हणत असतील उद्धवा, तुझा निर्णय चुकला; रामदास आठवले यांची टीका

पुणे :  “शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाऊन सत्ता स्थापन केली; पण त्यांनी शिवसेना (Shivsena) प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे शिवशक्ती आणि भीम शक्ती एकत्र असण्याचे स्वप्न अपूर्ण ठेवले. काल मी बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमास गेलो होतो. पुतळा पाहून एकच वाटले की, बाळासाहेब दोन्ही हात वर करून म्हणत असतील – उद्धवा, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाण्याचा तुझा निर्णय चुकला.” अशी टीका केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत केली.

रामदास आठवले म्हणालेत, “उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाऐवजी उपमुख्यमंत्रिपद घ्यायला हवे होते. मात्र तसे काही झाले नाही. मी त्यांना कालच्या कार्यक्रमात मनातून पुढील वाटचालीस शुभेछा दिल्या आहेत. पण त्यांच्यातील अंतर्गत कुरघोडीमुळे काँग्रेस कधीही पाठिंबा काढून घेईल. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचे जे स्वप्न होते, ते साकारण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे. यासाठी मी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार आहे; पण उद्धव ठाकरे यांनी किमान दोन वर्षे मुख्यमंत्री पद घ्यावे आणि उर्वरित तीन वर्षे देवेंद्र फडणवीस यांना देण्यात यावे. मला आजही वाटते भविष्यात आम्ही एकत्र येऊ.”

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER