
मुंबई :आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचं भूमिपूजन (Bhumi Pujan of National Monument of Balasaheb Thackeray) सायंकाळी ५ वाजता पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्यासहित उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आदित्य ठाकरे आणि सुभाष देसाई उपस्थित राहणार आहेत. भूमिपूजनासाठी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही निमंत्रित करण्यात आलेलं नाही.
यावरून भाजपा आमदार नितेश राणे यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. नितेश राणे यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “आज मा. बाळासाहेब असते तर, पहिले आमंत्रण देवेंद्रजींना दिले असते. मा. बाळासाहेब मनाचा राजा माणूस ! राजा होण्यासाठी मन मोठं लागतं. त्यांच्यानंतर फक्त किस्से मोठे आहेत, मनं खूप लहान झाली आहेत!” तसेच यावेळी त्यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनाही आमंत्रण न देण्यावरून आश्चर्य व्यक्त केलं आहे. “नगरविकास मंत्री एकनाथ यांनाही निमंत्रण कसं नाही? प्रोटोकॉल? आश्चर्य”, असे म्हणत त्यांनी शिवसेनेवर उपरोधिक टीकाही केली आहे.
आज मा. बाळासाहेब असते तर,
पहिले आमंत्रण देवेंद्रजींना दिले असते.मा. बाळासाहेब मनाचा राजा माणूस !
राजा होण्यासाठी मन मोठं लागतं,
त्यांच्यानंतर…
फक्त किस्से मोठे आहेत, मन खूप लहान झाली आहेत!
— nitesh rane (@NiteshNRane) March 31, 2021
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला