बाळासाहेब, आपण असता तर हिंदुत्वाशी तडजोड झाली नसती; नारायण राणे यांची श्रद्धांजली

narayane Rane & Balasaheb Thackeray

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज ८ वा (१७ नोव्हेंबर) स्मृतीदिन. बाळासाहेबांना आदरांजली वाहताना भाजपाचे नेते नारायण राणे (Naryane Rane) यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) टोमणा मारताना ट्विट केले – माननीय शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन. माननीय साहेब, आपण असता तर हिंदुत्वाशी तडजोड झाली नसती. पद आणि पैशासाठी आपण तत्वांशी कधीही प्रतारणा केली नसती. महाराष्ट्रातील आताचे सरकार नीतिमत्ता सोडून केवळ तडजोडीवर तयार झाले आहे. आपण असता तर हे घडू दिले नसते.

भाजपाने शिवसेनेसोबत युती करुन निवडणूक लढवली होती. दोघांना मिळून बुमठी मिळाले होते. परंतु, निकालानंतर मुख्यमंत्रीपदावर दोन्ही पक्षांमध्ये बिनसल. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी अशा तीन पक्षांच सरकार स्थापन झाल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER