बाळंतशेपा – नावातच दडलेय गुण !

Balantshepa

बाळंतशेप सौफ प्रमाणे दिसणारी अनेक गुण असणारी वनस्पति. आयुर्वेदात शतपुष्पा छत्रा शताह्व अहिच्छत्रा कारवी शतपत्रिका या पर्यायी नावाने आलेली. सौफ थंड असते तर बाळंतशेपा उष्ण असतो. काहीसा कडू तिखट चवीचा हा बाळंतशेपा. वात, कफ कमी करणारा पण काहीसा पित्त वाढविणारा असतो.

  • बाळ बाळंतीणी करीता अतिशय उपयुक्त अशी ही बाळंतशेप.
  • वेदना कमी करणारा असल्याने सूज वेदना असल्यास बाळंतशेपा भाजून त्याची कपड्यात पोटली बांधून शेक घेतल्यास ठणका कमी होतो पोट दुखणे, वायू मुळे पोट फुगणे या तक्रारीवर बाळंतशेप भाजून खावी किंवा पोटावर शेकावे.लहान
  • मुलांचे पोट दुखत असल्यास शेपेचा अर्क देतात.
  • तिखट कडू रसाचा असल्याने जीभेवर पांढरा स्तर असणे, चव नसणे तोंडात सतत लाळ सुटणे अशा तक्रारींवर बाळंतशेपा चावून चावून खाणे उपयोगी ठरतो.

बाळंतशेप मुख्यतः बाळंतीणीला प्रसुतीनंतर खाण्यास देतात. गर्भाशय साठलेले आर्तव स्वच्छ व्हावे याकरीता बाळंतशेप उत्तम कार्य करते. वात कमी करणारे, पोट फुगणे अपचन तक्रारी दूर करणारे असल्याने बाळंतीणीच्या सर्व तक्रारी दूर करणारी बाळंतशेप आहे. मुखवास प्रमाणे जेवणानंतर सौफ बाळंतशेप मिश्रण नक्की खावे.

बाळंतशेप ओवा याचे धूपन बाळंतीणीला देण्याने वात कमी होतो.

मासिक पाळीच्या वेळी पोट कंबरदुखी असेल किंवा पाळी अनियमित असेल तर बाळंतशेपाचे पाणी पिल्यास फायदा होतो. अनेक स्त्रीरोग चिकित्सेतील आयुर्वेदिक (Ayurveda) कल्पांमधे शेपेचा उपयोग केला जातो. बस्ति पंचकर्माकरीता शतपुष्पा (बाळंतशेपा) सिद्ध तेल वापरण्यात येते.

अशी ही शतपुष्पा वा बाळंतशेप कमी वापरण्यात येणारी पण प्रसुतीनंतर मातेला अतिशय उपयुक्त.

ह्या बातम्या पण वाचा : 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER