सुनील नारायणवरचे बालंट टळले

Sunil Narine

कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) गोलंदाज सुनील नारायण (Sunil Narine) याच्यावरील संकट टळले आहे. त्याच्या गोलंदाजी शैलीबद्दलचा संशय अनाठायी असल्याचे स्पष्ट झाले असून आता त्याला गौलंदाजी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. आपीएलच्या (IPL) संदेहास्पद गोलंदाजी शैली समितीने त्याला दोषमुक्त ठरवले आहे.

किंग्ज इलेव्हन विरुध्दच्या सामन्यावेळी त्याच्या गोलंदाजी शैलीवर शंका घेण्यात,आली होती. त्यानंतर केकेआरच्या व्यवस्थापनानेच त्याच्या अधिकृत परिक्षणाची विनंती केली होती. यासाठी त्यांनी सुनीलच्या गोलंदाजी विविध गती व वेगवेगळ्या कोनातील चित्रफितीसुध्दा समितीला सादर केल्या होत्या. समितीने त्या पाहून नारायणच्या कोपर वळवण्याची शैली मर्यादेतच असल्याचा निष्कर्ष काढला आहे. मात्र चित्रफितीत दिलेल्या शैलीनेच त्याने पुढील सामन्यांमध्ये गोलंदाजी करावी असे सुचित करण्यात आले,आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER