शिवसेनेत खळबळ! अधिवेशनाला उपस्थित असणाऱ्या आमदाराला कोरोनाची लागण

Balaji Kinikar

मुंबई : राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. आतापर्यंत अनेक राजकीय नेतेही कोरोनाच्या विळख्यात सापडले असून शिवनेनेचे (Shivsena) आमदार डॉ. बालाजी किणीकर (Balaji Kinikar) यांना कोरोनाची (Corona virus) लागण झाली आहे. डॉ. किणीकर हे अंबरनाथ मतदारसंघाचे आमदार आहेत. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना मुंबईच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे.

सोमवारपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले होते. त्या अधिवेशनाला किणीकर उपस्थित होते. महत्त्वाचे म्हणजे या पावसाळी अधिवेशनात किणीकर यांची विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती.

दरम्यान सोमवार आणि मंगळवारी अधिवेशनाला उपस्थिती लावल्यानंतर त्यांना अंगदुखीचा त्रास जाणवू लागला. यावेळी केईएम रुग्णालयात कोरोना चाचणी केली असता रात्री त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. यासंदर्भात किणीकर यांनी स्वतः माहिती दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER