भाजप-मनसे युतीवर बाळा नांदगावकरांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Bala Nandgaonkar - Raj Thackeray - Chandrashekhar Bawankule

मुंबई : वाढीव वीज बिलाच्या प्रश्नावरून मनसे (MNS) आता आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. याबाबत आज मनसेची बैठक झाली. मनसेच्या या आंदोलनाला भाजपानेही (BJP) पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर आता मनसे भाजपाच्या युतीच्या चर्चा रंगल्या आहेत. याविषयी मनसे नेते बाळा नांदगावकर यांना पत्रकारांनी छेडले असता त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) जर बोलत असतील तर त्यांनी आंदोलनात सामील व्हावं, असं मनसेचे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) म्हणाले आहेत. भाजपच काय काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीही (NCP) या आंदोलनात सहभागी होऊ शकते. त्यांनाही वाढीव वीज बिलं आलीच आहेत, असं ते म्हणाले.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसे पदाधिकाऱ्यांची आज बैठक पार पडली. या बैठकीत वाढीव वीज बिलाविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी हे आवाहन केलं आहे. सध्या आम्ही एकला चलो आहोत. महापालिका निवडणुकीबाबत राज ठाकरे निर्णय घेतील. भाजप-मनसे युतीबाबत बोलण्यास त्यांनी नकार दिला. हा विषय माझ्या अखत्यारीत येत नाही, असं सांगून या प्रश्नावर त्यांनी अधिक बोलणं टाळलं. विशेष म्हणजे काही तासांपूर्वीच भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळेंनी मनसेच्या आंदोलनात भाजप सहभागी होणार असल्याची घोषणा केली होती. वीज बिलाबाबतच्या भूमिकेबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचं मनापासून अभिनंदन (Chandrashekhar Bawankule Reaction On Raj Thackeray). भाजपसुद्धा त्यांच्यासोबत या आंदोलनात उतरेल, अशी मोठी घोषणा भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली होती. त्यालाच मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी उत्तर दिलं आहे.

वीज बिल माफी देता येणार नसल्याचं राज्य सरकारनं स्पष्ट केल्यानंतर मनसेने वीज बिल माफीच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. वीज बिलात माफी देण्याच्या मुद्द्यावरून राज्य सरकारने राज्यातील साडेअकरा कोटी जनतेचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे जनतेत संतापाची भावना असून सोमवारपर्यंत बिल माफ करा, अन्यथा राज्यात जिल्ह्याजिल्ह्यांत जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी आज दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER