पुनश्च हरिओम म्हणता अन् हरीलाच कोंडून ठेवता? मनसेचा सवाल

Bala Nandgaonkar

मुंबई : कोरोनामुळे जाहीर झालेला लॉकडाऊन ठाकरे सरकार (Thackeray Govt) टप्प्याटप्प्याने शिथिल करत आहे. राज्यात सध्या अनलॉकची प्रक्रिया सुरू असून अनेक गोष्टींवरील निर्बंध उठवले जात आहे. मात्र धार्मिळ स्थळे सुरू करण्याची मागणी करण्यात येत असली तरी सरकारने अद्याप ती सुरू करण्याचा निर्णय घेतलेला नाही. या पार्श्वभूमीवर मनसेचे नेते आणि माजी आमदार बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले .

पुनश्च हरिओम म्हणता अन् हरीलाच कोंडून ठेवता? असा सवाल नांदगावकर यांनी केला आहे. राज्यात बार उघडले. बारची वेळही ठरवून दिली. आता जलतरण तलाव, मल्टिप्लेक्सलाही परवानगी दिली. कोरोना काय फक्त मंदिरातच होतो काय? काय तर्क असावा यामागे हे कोडेच आहे. हा केवळ भावनेचा प्रश्न नाही तर मंदिरावर अवलंबून असणाऱ्या हजारो व्यावसायिकांच्या रोजीरोटीचाही प्रश्न आहे, असं नांदगावकरांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER