बचेंगे तो और भी लढेंगे ! आपला प्रत्येक महाराष्ट्र सैनिक लढवय्या आहे; मनसे नेत्याची प्रतिक्रिया

Bala Nandgaonkar

मुंबई :- मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ग्रामपंचायत निवडणूक (Gram Panchayat Election) ताकदीने लढण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले होते. त्यानुसार मनसेने (MNS) ग्रामपंचायत निवडणुकीत ताकद लावल्याचं दिसते. कारण मनवसेने मुंबईजवळची ग्रामपंचायत असो की तिकडे विदर्भ, आपलं अस्तित्व दाखवून दिलं आहे. ग्रामपंचायतीच्या या यशानंतर मनसेचे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी “बचेंगे तो और लढेंगे” असं म्हणत विजयी झालेल्या मनसे पुरस्कृत उमेदवारांचे अभिनंदन केले आहे.

नांदगावकर फेसबुकद्वारे म्हणाले की, नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल काल आलेत. खरे तर ग्रामपंचायत ही सहसा पक्षपातळीवर न लढता स्थानिक पॅनलद्वारे लढली जाते. सोमवारी निकाल आल्यापासून सर्व जण मोठ्या यशाचे व इतरही  अनेक दावे करत आहेत. आपण या कोणत्याच भानगडीत न पडता पुढे जाऊया. आपल्या पक्षाला मिळालेले यश हे निश्चितच आशादायक आहे. पक्षाच्या सर्व विजयी उमेदवारांचे तसेच प्रत्यक्षात मैदानात उतरून लढा दिलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे व राज्यातील सर्व जनतेचेही मनापासून आभार व हार्दिक अभिनंदन, असे बाळा नांदगावकर यांनी म्हटले आहे.

ही बातमी पण वाचा : ग्रामपंचायत निवडणुकींच्या अधभूतपुर्व निकालानंतर मनसेने दिली प्रतिक्रिया 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER