रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठेला हैद्राबादमध्ये अटक

Bal Bothela, the mastermind of the Rekha Jare murder, was handcuffed in Hyderabad

अहमदनगर :- राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यां व यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे खूनप्रकरणातील (Rekha Jare Murder) मुख्य सूत्रधार आणि मागील तीन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या पत्रकार बाळ बोठे अखेर पोलिसांच्या हाती लागला. अहमदनगर पोलिसांनी शनिवारी पहाटे त्याला हैद्राबादमधून ताब्यात घेतले. रेखा जरे यांच्या हत्येनंतर जवळपास साडेतीन महिन्यांपासून तो फरार होता.

रेखा जरे यांचा ३० नोव्हेंबर २०२० रोजी रात्री अहमदनगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाटात खून झाला होता. या खुनाच्या कटकारस्थानात पोलिसांनी काही आरोपींना अटक केली होती. या आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार जरे यांच्या खुनाची सुपारी बाळ बोठे व सागर भिंगारदिवे यांनी दिल्याचे पोलीस तपासात समोर आलं होतं. यावेळी गाडीत बसलेल्या रुणाल याने मारेकऱ्यांना पाहिलं होतं. त्याच्याच मदतीने पोलिसांनी तातडीने ५ आरोपींना गजाआड केलं. मात्र, जेव्हा या आरोपींची चौकशी करण्यात आली, तेव्हा या हत्याकांडात शहरातील पत्रकार बाळ बोठे असल्याचं समोर आलं. बाळ बोठेने सुपारी देऊन हे हत्याकांड घडवून आणल्याचा जबाब या आरोपींनी दिला.

अहमदनगर पोलिसांनी तातडीने तपास करत रेखा जरेंच्या मारेकऱ्यासह ५ आरोपींना अटक केली. मात्र, या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार बाळासाहेब बोठे फरार होता. रेखा जरे यांच्या हत्येला तीन महिने उलटल्यानंतरही बाळ बोठेला पकडण्यात पोलिसांना अपयश आल्याने रेखा जरे यांचे कुटुंबीय आमरण उपोषणाला बसले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER