मुंबईतील राममंदिर रेल्वे स्टेशनच्या उदघाटन सोहळ्यात बीजेपी,बजरंग दल च्या कार्यकर्त्यांचा गोंधळ

Bajrang Dal

मुंबई : मूंबईतील राममंदिर रेल्वे स्टेशनच्या उदघाटना प्रसंगी भाजप,शिवसेना, आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालून केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्यासमोर जय श्री रामच्या घोषणा दिल्या. कार्यकर्त्यांच्या गोंधळामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होत.

आज मुंबईतील राममंदिर रेल्वे स्टेशनच उदघाटन केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू, शिवसेनेचे खासदार गजाजन कीर्तिकर, किरीट सोमय्या याच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजप, बजरंग दल,आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जय श्री राम आणि मंदिर वही बनायेंगे च्या घोषणा दिल्या