
अलाहाबाद: ‘मुख्तार अन्सारी या कुख्यात गुंडास २४ तासांत सोडले नाही तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांची हत्या केली जाईल’, असा धमकीचा संदेश व्हॉट््सअॅपवरून पाठविल्याबद्दल अटक केल्या गेलेल्या अमर पाल यादव (Amar Pal Yadav) नावाच्या ट्रक ड्रायव्हरला अलाहाबाद उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला.
हा व्हॉट््सअॅप संदेश यादव याच्या मोबाईल नंबरवरून ‘युपी ११२’ या हेल्पलाइन नंबरवर पोठविला गेला होता. परंतु आपल्या मोबाईल फोनचा दुरुपयोग करून दुसºयाच कोणीतरी हा संदेश पाठविला असे अमरपालचे म्हणणे आहे व त्याबद्दल त्याने बिनशर्त दिलगिरी व्यक्त केली आहे, असे नमूद करून न्या दिनेश कुमार सिंग यांनी यादव यास जामीन मंजूर केला.
आरोपीच्या वकिलाने कोर्टात असा युक्तिवाद केला की, अमरपाल ट्रक ड्रायव्हर आहे व त्याचा मुख्तार अनासारी किंवा अन्य ोकणत्याही गुंडासी कोणताही संबंध नाही. तो ट्रक घेऊन बाहेरगावी जात असता वाटेत एका धाब्यावर जेवणासाठी थांबला तेव्हा तेथे जावायला आलेल्या इतर ड्रायव्हरपैकी कोणीतरी ‘अर्जंट’ फोन करण्यासाठी यादव याचा मोबाईल मागून घेतला होता. त्याच माणसाने हा व्हॉट््सअॅप संदेश पाठविला असावा. स्वत: यादव यास पोलिसांनी अटक केल्यावरच झाला प्रकार कळला होता.
यादव याने तुरुंगातून केलेले वरीलप्रकारच्या कथनाचे प्रतिज्ञापत्रही न्यायालयात सादर केले गेले. योगी आदित्यनाथ यांना ठार मारण्याची अशा धमकी व्हॉट््सअॅपवरून दिली जाण्याची व आरोपीला उच्च न्यायालयाने जामीन देण्याची ही लागोपाठ दुसरी घटना आहे. याआधी बॉम्बस्फोट करून आदित्यनाथ यांना ठार मारम्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून अटक केल्या गेलेल्या कमरान अमीन खान नावाच्या २५ वर्षांच्या तरुणाला जामीन मंजूर केला गेला होता.
अजित गोगटे
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला