भाजप पदाधिकाऱ्याला चोप देणाऱ्या शिवसैनिकांचा सत्कार

Pandharpur-Shivsena

पंढरपूर : वाढीव वीज बिला विरोधातील आंदोलनादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांच्या बद्दल अपशब्द विधान केल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी एका भाजप (BJP) पदाधिकाऱ्याला काळं फासलं होतं. या प्रकरणी अटक झालेल्या 17 शिवसैनिकांचा जामीन मंजूर केला आहे. या शिवसैनिकांची जामिनावर सुटका होताच त्यांचा सत्कार करण्यात आला. तसंच जर पुन्हा कुणी शिवसेनेच्या नेतृत्वाबद्दल अपशब्द काढले तर यापेक्षा गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल, असा थेट इशारा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

वीज बिल विरोधातील आंदोलनादरम्यान भाजपचे माजी उपजिल्हाअध्यक्ष शिरीष कटेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्दात टीका केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला होता. त्यानंतर कटेकर यांना गाठत काही शिवसैनिकांनी त्यांना काळं फासलं. त्याचबरोबर त्यांना साडी नेसवण्याचाही प्रयत्न केला गेला. शिवसेनेचे पंढरपूर शहर अध्यक्ष रवी मुळे ,संदीप केंदळे ,सुधीर अभंगराव ,लंकेश बुरांडे सह 25 पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर पंढरपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आलाय. त्यातील 17 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यांना जामीन मंजूर झाला आहे.

शिरीष कटेकर यांना शिवसैनिकांनी काळं फासल्यानंतर भाजपच्या काही नेत्यांनी त्या शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर 17 शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. सोमवारी सकाळी त्यांना जामीन मंजूर झाला. जामीन मिळालेल्या शिवसैनिकांचा सत्कार शिवसेना समन्वयक शिवाजी सावंत यांनी केला. त्याचबरोबर यापुढे शिवसेना नेतृत्वाबद्दल अशा प्रकारची टीका केल्यास गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल, असाही इशारा शिवसेनेनं दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER