वाशी टोलनाका तोडफोड प्रकरण : राज ठाकरे यांना सशर्त जामीन मंजूर

Raj Thackeray

मुंबई :- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना वाशी टोलनाका तोडफोड प्रकरणी वाशी न्यायालयानं सशर्त जामीन मंजूर केला आहे. राज ठाकरे यांच्यासोबत मनसेच्या वकिलांची फौज सोबत होती. नवी मुंबईतील वाशी टोलनाका तोडफोड प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याविरोधात बेलापूर न्यायालयाने वॉरंट जारी केला होता. राज ठाकरेंच्या स्वागतासाठी मनसैनिकांनी टोलनाक्यावरच पोस्टरबाजी केली आहे.

राज ठाकरेंना १५ हजारांंच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. तर, पुढील सुनावणीला गैरहजर राहण्याची मुभा देण्यात आली आहे. पुढील सुनावणी ५ मे रोजी होणार आहे. राज ठाकरे वाशी कोर्टाच्या दिशेने निघालेले आहेत. २०१४ मध्ये वाशी टोलनाक्यावर तोडफोड झाली होती.

राज ठाकरेंना यापूर्वी २०१८ आणि २०२० मध्ये समन्स काढण्यात आले होते. मात्र, त्यावेळी राज ठाकरे उपस्थित राहिले नव्हते. त्यामुळे राज ठाकरेंना वॉरंट काढले गेले. राज ठाकरेंसोबत मनसेचे नेते नितीन सरदेसाई आणि बाळा नांदगावकर उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER