जयंत पाटलांच्या दौ-यानंतर बहुजन समाजाच्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Bahujan Samaj activists join NCP after Jayant Patil's visit

चंद्रपुर :- १ फेब्रुवारी २०२१ ला चंद्रपूर (Chandrapur) येथील पंचवटी लॉन येथे अनेक बहुजन समाजातील (Bahujan Samaj) सामाजिक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष हिराचंद बोरकुटे. महासचिव डी के अरीकर माजी नगराध्यक्ष दीपक जयस्वाल महिला अध्यक्षा बेबीताई उइके राणी राव माणिक लोणकर मनोहर रस्पयले यांची उपस्थिती होती.

दरम्यान, राष्ट्रवादीचे मोठे नेते, राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) सध्या राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमासाठी राज्याच्या दौऱ्यावर आहेत. नुकतीच त्यांनी चंद्रपुरला भेट दिली. तेथे अर्ध्या रात्री ताफा थांबवून तेथील महिलांच्या समस्या ऐकून घेतल्याचे त्यांचे फोटोही सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाले होते. तसेच, जयंत पाटील यांचे कौतुक तळागाळातील लोकांच्या समस्या जाणून घेणारा नेता म्हणून त्यांना सामान्य नागरिकांकडून कौतुकाची थापही मिळाली होती.

तसेच, जयंत पाटील यांनी दौ-यापुर्वीट आपम पक्षबळकटीकरणासाठी, पक्षवाढीसाठी महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याचे सांगितले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER