बॅडमिंटनच्या थॉमस व उबेर कप स्पर्धा पुढे ढकलल्या

Thomas & Uber Cup Postponed

जागतिक बॅडमिंटन (Badminton) महासंघाने थॉमस आणि उबेर कप (Thomas And Uber Cup) स्पर्धा पुढे ढकलल्या आहेत. डेन्मार्क मधील आरहूस येथे 3 ते 11 ऑक्टोबर दरम्यान ही स्पर्धा होणार होती. आता या स्पर्धा 2021 मध्ये होणार आहेत.

बॅडमिंटन डेन्मार्कशी चर्चा करून हा निर्णय घेतला आहे असे जागतिक महासंघाने म्हटले आहे. बऱ्याच संघांनी या दोन्ही स्पर्धातून माघार घेतल्याने हानिर्णय घेण्यात आला आहे. दर दोन वर्षांनी या स्पर्धा होतात मात्र इंडोनेशिया, दक्षिण कोरिया, थायलंडसारख्या आघाडीच्या संघांनी माघार घेतली होती.

बॅडमिंटन पुन्हा सुरु व्हावे म्हणून जागतिक महासंघ व बॅडमिंटन डेनमार्क बऱ्याच दिवसापासून प्रयत्न करत आहे. त्यासाठी बायो बबलची सुद्धा त्यांची तयारी होती. मात्र जगभरात कोविड 19 (COVID-19) संदर्भातील अलीकडच्या घडामोडीनी अनेक खेळाडू व संघ सहभागास तयार नव्हते. त्यांच्या भावनांचा आदर करून हा निर्णय घेतला गेला आहे.

दरम्यान, ओडेन्स येथे होणारी डेन्मार्क ओपन स्पर्धा नियोजनानुसारच 13 ते 18 आॕक्टोबर दरम्यान होणार आहे. मात्र 20 ते 25 आॕक्टोबर दरम्यान होणारी डेन्मार्क मास्टर्स 2020 स्पर्धा रद्द करण्यात आली आहे.

1982 नंतर प्रथमच या स्पर्धा युरोपमध्ये होणार होत्या.

भारताच्या आघाडीच्या खेळाडू पी.व्ही. सिंधू व साईना नेहवाल यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. महामारीच्या काळात या स्पर्धा घेण्यावर साईनाने प्रश्न उपस्थित केले होते. सिंधूने म्हटले आहे की खेळाडूंचे आरोग्य व सुरक्षा सर्वात महत्त्वाची आहे आणि सध्याची परिस्थिती पाहता हा निर्णय अपेक्षितच होता, त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. आयुष्य सर्वात महत्त्वाचे आहे. म्हणून धोका पत्करून खेळायची ही वेळ नाही. मात्र आपण सराव नियमीतपणे सुरुच ठेवणार आहोत कारण कोणत्याही वेळी मी स्पर्धेला तयार असेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER