खा. संभाजीराजे विरोधात अपशब्द : ॲड. सदावर्ते विरोधात संताप

खा. संभाजीराजे विरोधात अपशब्द - ॲड. सदावर्ते विरोधात संताप

कोल्हापूर : खा. संभाजीराजे (Sambhaji Raje) हे मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) प्रयत्न करत आहेत. ते आरक्षणाची न्यायिक लढाई लढत असताना त्यांच्याकडून समाजाला योग्य दिशा देण्याचे काम सुरू आहे. ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी खा. संभाजीराजे यांना अफजलखानाची उपमा दिल्याने समस्त कोल्हापूरकरांच्या (Kolhapur) भावना दुखावल्या आहेत.

खा. संभाजीराजे छत्रपती यांना अपशब्द वापरल्या प्रकरणी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात संताप व्यक्त होत आहे. शिवाजी चौक येथे त्यांच्या प्रतिमेला जोडे मारत त्यांचे पोस्टर जाळण्यात आले. सदावर्ते यांच्या प्रतिमेला तब्बल साडेचार फुटांची पायतान घेऊन जोडो मारो आंदोलन करण्यात आले.

आंदोलनकर्त्यांनी त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. सदावर्ते यांनी केलेले वक्तव्य मागे घेऊन त्यांनी छत्रपती घराण्याची माफी मागावी अन्यथा कोल्हापुरी हिसका दाखवू असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. अ‌ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे मराठा समाज बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. सदावर्ते यांच्यावर शासनाने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER