50 दिवसांनंतर भ्रष्टाचा-यांसाठी बुरे दिन येतील – पंतप्रधान मोदी

PM Narendra Modi

मुंबई : मुंबईतील अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या जलपूजन- भूमीपूजनाच्या कार्यक्रमानांतर वांद्रे -कुर्ला संकुलात आयोजित सभेत बोलताना मोदी म्हणालेत, भ्रष्टाचाराची लढाई ही अशीच सुरु राहणार. आता 50 दिवसानंतर प्रामाणिक नव्हे तर भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांचे ‘बुरे दिन’ येणार आहेत. नोटबंदीच्या निर्णयानंतर काळा पैसा सफेद करणा-यांनी बँकांची मदत घेतली, त्यांनी स्वत: बरोबर बँक कर्मचा-यांनाही गोत्यात आणले.

भ्रष्टाचार करणार्यांना सोडणार नाही, आता सरकार बदलली आहे. ‘ असं म्हणत त्यांनी काँग्रेसला टोलाही लगावलाय. यावेळी मोदी म्हणालेत देशातील जनता भ्रष्टाचार, काळापैसा सहन करणार नाही, तुम्हाला कायद्याची, मोदींची, भिती वाटत नसली तरी चालेल पण तुम्हाला 125 कोटी जनतेचा धाक वाटलाच पाहिजे. दरम्यान पंतप्रधान मोदींच्या हस्ते 1 हजार 70 विकास प्रकल्पांचं उदघाटन ही करण्यात आलं.

यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आदी उपस्थित होते.