दप्तराचे ओझे होणार कमी : केंद्राचे निर्देश

Backpack burden will be less- Centre's instructions

नवी दिल्ली : नवीन शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीचे निर्देश केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने दिले आहेत. नव्या धोरणानुसार इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या  दप्तराचे ओझे त्याच्या शारीरिक वजनाच्या १० टक्क्यांहून जास्त नको, असे स्पष्ट करण्यात आले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने सर्व राज्य, केंद्रशासित प्रदेशांना नवीन शैक्षणिक सत्रापासून नियमांचे काटेकोर पालन करण्याचे शिक्षण मंत्रालयाने नवीन स्कूल बॅग धोरणांतर्गत अनेक उपाययोजनांची घोषणा केली आहे. विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे (Backpack burden) तपासण्यासाठी शाळेत वजनकाटे ठेवण्यात येतील.

शाळेत नियमित  स्कूल बॅगच्या वजनावर लक्ष ठेवावे लागेल. प्रकाशकांना शैक्षणिक पुस्तकांच्या मागे त्याचे वजनही छापील स्वरूपात द्यावे लागेल. पहिलीतील मुलांसाठी एकूण १,०७८ ग्रॅम वजनाची तीन पुस्तके राहतील. इयत्ता बारावीतील विद्यार्थ्यांसाठी एकूण सहा पुस्तके असतील. त्यांचे वजन ४ हजार १८२ ग्रॅम राहील, शाळकरी मुलांच्या बॅगमध्ये पुस्तकांचे वजन ५०० ग्रॅम ते ३.५ किलोग्रॅमपर्यंतच राहील.

तर वह्यांचे वजन २०० ग्रॅम ते २.५ किलोग्रॅम राहील. यात जेवणाचा डबा तसेच पाण्याच्या बॉटलचे वजनही समाविष्ट आहे. नवीन धोरणानुसार पायऱ्या चढताना चाके असलेली बॅग मुलांना जखमी करू शकते. त्यामुळे तिच्या वापरावर बंदी घालण्यात येणार आहे. शाळांकडून मुलांना जी सुविधा उपलब्ध करवून देणे आवश्यक आहे ती मुबलक प्रमाणात तसेच चांगल्या गुणवत्तेत उपलब्ध करवून देण्याचे निर्देशही मंत्रालयाने दिले आहेत. इयत्ता दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना गृहपाठ देण्यात येणार नाही.

इयत्ता तिसरी ते सहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना आठवड्यात दोन तासांपर्यंतचा गृहपाठ, इयत्ता ६ वी ते ८ वीकरिता दररोज एक  तासाचा गृहपाठ तसेच इयत्ता ९ वी ते १२ वीकरिता दररोज जास्तीत जास्त दोन  तासांपर्यंतचा गृहपाठ देण्याची मर्यादा घालून देण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER