बच्चू कडू यांनी केंद्र सरकारचे मानले आभार

मुंबई : देशात पहिली किसान रेल्वे (Kisan Railway) सुरू झाले आहे. यासाठी राज्यमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहे. किसान रेल ही चांगली संकल्पना आहे. त्यामुळे अगदी ९०% नाही पण किमान १०% तरी फायदा हा शेतकऱ्यांना होईल. त्यामुळे मी केंद्र सरकारचे आभार मानतो. असे महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) मंत्री बच्चू कडू म्हणाले.शेतकरी हितासाठी ही किसान रेल्वेे लाभदायी असल्याचे मत बच्चू कडू यांनी व्यक्त केले आहे.

केंद्र सरकारने आता राज्याच्या इतर भागांतूनही किसान रेल्वे सुरु करावी, अशी मागणीही बच्चू कडू यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

ते म्हणाले, किसान रेल ही चांगली संकल्पना आहे. त्यामुळे अगदी ९०% नाही पण किमान १०% तरी फायदा हा शेतकऱ्यांना होईल. त्यामुळे मी केंद्र सरकारचे आभार मानतो. यासोबतच मराठवाडा, विदर्भ,पश्चिम महाराष्ट्र ,आणि कोकण या भागांतूनही एक एक किसान रेल्वे सरकारने सुरू करावी. जर प्रत्येक भागातून अशी रेल्वे सुरू झाली तर शेतकऱ्यांना देशांतर्गत बाजारपेठ उपलब्ध होईल, असा आशावाद बच्चू कडू यांनी व्यक्त केला.

चालू वर्षाच्या अर्थसंकल्पात कृषी आणि नाशवंत उत्पादनांच्या पुरवठा करण्यासाठी किसान रेल्वेची घोषणा करण्यात आली होती. या घोषणेनुसार राज्यातील देवळाली ते दानापूरपर्यंतची पहिली किसान पार्सलगाडी सुरु झाली आहे. भुसावळ रेल्वे मंडळ विभागातून ही गाडी सुरु करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER