मंत्री बच्चू कडूंना दुसऱ्यांदा कोरोना ! जाणून घ्या दुसऱ्यांदा का होते कोरोनाची लागण?

Bachchu Kadu

महाराष्ट्र कोरोना पुन्हा तेजीनं पसरत असल्याचे चित्र आहे. गेल्या दहा दिवसात कोरोनाचे रुग्ण वाढतायेत. शुक्रवारी महाराष्ट्रात ६,११२ कोरोनाचे नवे रुग्ण सापडले. महाराष्ट्रात कोरोनाच्या २०,८७,६३२ केसेस होत्या. पैकी ५१,७१३ लोकांना जीव गमवाला लागला. अमरावती, यवतमाळ आणि मुंबईत कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी निर्बंध लादण्यात आले आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता निर्बंध लागू करण्यात आलेत. कोरोना रोखण्यासाठीची मार्गदर्शक तत्वे राज्यांनी लागू करावीत, असे अवाहन करण्यात आलंय. अशातच एकदा कोरोना होवून गेल्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा कोरोना होत असल्याच समोर आलंय. यात मंत्र्याचाही समावेश आहे.

अमरावतीच्या आचलपूरमधून निवडूण आलेले राज्यमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांना कोरोनाची दुसऱ्यांदा लागण झालीये. ट्विटरद्वारे ही माहिती देताना ते म्हणाले, “माझी कोरोना चाचणी दुसर्‍यांदा पॉझिटिव्ह आली असून, सध्या मी आयसोलेशनमध्ये आहे. मागील काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वत:ची काळजी घ्यावी, आवश्यक वाटत असेल, तर स्वतःची चाचणी करून घ्यावी.”

बच्चू कडूंवर अमरावतीच्या रुग्णालयातच उपचार सुरुयेत. त्यांच्या रक्त तपासणीचे रिपोर्ट नॉर्मल आलेत. घाबरायच काही कारण नसल्याच डॉक्टरांच म्हणनं आहे. एकदा कोरोना होवून गेल्यानंतरही दुसऱ्यांदा होणारी कोरोनाची लागण, ही चिंतेची बाब असल्याचं नागरिकांच मत आहे. कोरोनाच्या खर्च्यात अनेकांच कंबरडं मोडलंय. बऱ्याच जणांच्या अंगावर कर्ज होवून बसलंय. त्यात कोरोना होवून गेलेल्यांना पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता वर्तवल्या जात होत्या. अशातच बच्चू कडूंना पुन्हा कोरोनाची लागण झालेली बातमी बघून सामान्यांचे धाबे दणाणलेत.

दुसऱ्यांदा संसर्ग होण्याच काय कारण?

एकदा कोरोनाचा संसर्ग होवून गेल्यानंतर दुसऱ्यांदा कोरोना का होतो? त्याचे परिणाम काय असू शकतात? यावर इंग्लंडच्या किंग्ज कॉलेजमध्ये अभ्यास सुरु आहे. या अभ्यासानूसार, कोरोना झाल्यानंतर दहा दिवसात अँटीबॉडीज तयार होतात. पण काही महिन्यांनी त्या अँटीबॉडीज कमी व्हायला लागतात. दुसऱ्यांदा कोरोनाचा संसर्ग होणं ही दुर्मिळ गोष्ट आहे. रोग प्रतिकारक शक्ती कमी असल्यामुळं दुसऱ्यांदा कोरोना होतो असं या अभ्यासातून समोर आलंय.

कोरोनाचा संसर्ग होवून गेल्यानंतर आयुष्यभर कोरोनाचा संसर्ग होणार नाही, असा याचा अर्थ घेऊ नये. कोव्हिडमुक्त झाल्यानंतर ३ ते ६ महिने एखाद्याची रोगप्रतिकार शक्ती टिकाव धरते. यानंतर कोरोना होवू शकतो असं तज्ञांच मत आहे.

डॉक्टरांनाही होतोय दुसऱ्यांदा कोरोना

मुंबईतील डॉक्टरांना पुन्हा कोरोनाची लागण होत असल्याच्या घटना समोर येतायेत. मुंबई मनपाच्या नायर आणि सायन रुग्णालयातील डॉक्टरांना पुन्हा कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय. दोन महिन्यापूर्वी कोरोना होऊन गेलेल्या डॉक्टरांना होत असलेली कोरोनाची लागण चिंतेची बाब आहे.

ऑक्टोबरमध्ये दुसऱ्यांदा कोरोना होणाऱ्यांची संख्या अत्यल्प होती. ऑल इंडिया मेडिकल काउंसिल ऑफ मेडीकल रिसर्चचे प्रमुख डॉ. बलराम भार्गव यांनी देशभरात फक्त तिघांना कोरोनाची दुसऱ्यांदा लागण झाल्याचं सांगितलं होतं. त्या तुलनेत आता हा आकडा मोठ्या प्रमाणात वाढतोय.

जागतिक स्तरावर कशी आहे परिस्थीती?

कोरोना विषाणूचा दुसऱ्यांदा होत असलेला संसर्ग ही दुर्मिळ गोष्ट असल्याचं जागतिक पातळीवर दिसतं. मोजक्याच देशात या घटना घडल्यात. दुसऱ्या वेळी कोरोनाची लागण झाल्यानंतर आढळणारा विषाणू वेगळ्यापद्धतीचा असल्याचे जागितक आरोग्य संघटनेचे म्हणने आहे. नेदरलँड आणि हॉंगकॉंगमध्ये या घटना समोर आल्या असल्यातरी कोरोनाचा संसर्ग पहिल्यावेळे इतका गंभीर नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेनं स्पष्ट केलं होतं.

‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER