अंत्यविधिसाठी खोदलेल्या खड्यात सापडली नवजात बालिका !

baby

बरेली : उत्तर प्रदेशातील बरेलीच्या सीबीगंज भागात वेस्टर्न कॉलनीत राहणारे हितेशकुमार सिरोही यांच्या घरी गुरुवारी मुलीचा जन्म झाला. ती फार थोडा वेळ जगली.

मुलीच्या अंत्यविधिसाठी स्मशानात खड्डा खोदणे सुरू असताना, साधारण ३ फूट खोलवर फावडा हंड्यात अडकला. लोकांनी हंडा जपून बाहेर काढून उघडला तर त्यात जिवन्त नवजात बालिका सापडली.

गाडल्यामुळे श्वास कोंडल्याने तिची प्रकृती गंभीर झाली होती. हितेशकुमार यांनी तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तिची प्रकृती सुधारते आहे. देवाने हिरावून घेतलेल्या मुलीच्या बदल्यात, दैवाने मुलगी दिली; असे म्हणून हितेशकुमार यांनी त्या बालिकेला दत्तक घेतले.

दरम्यान, त्या खड्ड्यात सापडलेल्या बालिकेला गाडले कोणी याचा पोलीस तपास करत आहेत.