बाबासाहेब आंबेडकर जयंती : प्रकाश आंबेडकरांनी केले आवाहन

Prakash Ambedkar - Dr. Babasaheb Ambedkar - Maharashtra Today

मुंबई :- राज्यात कोरोनाचे (Corona) संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी (५ एप्रिल) रात्रीपासून आदेश लागू झाले असून, ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध राहणार आहेत. याच कालावधीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीही (Babasaheb Ambedkar Jayanti) असून, तो मुद्दा उपस्थित होत आहे. हे पाहता वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी राज्यातील जनतेला महत्त्वाचं आवाहन केलं आहे.

राज्यात ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध असणार आहेत. रात्री संचारबंदी, तर दिवसा जमावबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सरकारकडून काय निर्णय घेतला जातो याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी आवाहन केले आहे.

महाराष्ट्र शासनाने पुन्हा लॉकडाऊन (Lockdown) लावला आहे. तो योग्य की अयोग्य हा विषय वेगळा आहे. १४ एप्रिलला बाबासाहेबांची जयंती साजरी होते. त्याबाबत शासन काही नियमावली जाहीर करेल, असे सांगण्यात येते . तेव्हा संपूर्ण जनतेला माझे आवाहन आहे की, आपण शासनाच्या नियमांनुसारच जयंती साजरी करा, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button