नगरमध्ये कोणीही भाजपातून राष्ट्रवादीत जाणार नाही; भाजपा नेत्याचे राष्ट्रवादीला प्रत्युत्तर

babanrao-pachpute & Prajkt Tanpure

मुंबई :- अहमदनगर जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत, असा दावा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केला होता. त्यांच्या या दाव्यावर भाजपा (BJP) नेते बबनराव पाचपुते यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

नगर जिल्ह्यातून भाजपामधलं कुणीही राष्ट्रवादीत जाणार नाही. स्वत: काही काम करायचं नाही आणि मग आपल्या कामाचं अपयश झाकण्यासाठी अशा वावड्या उठवायच्या, अशा शब्दात पाचपुते यांनी तनपुरे यांना सुनावले आहे. “नगर जिल्ह्यातून भाजपामधलं कुणीही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार नाही. तशी सुतराम शक्यतादेखील नाही. आहेत तिथे आपापल्या जागी सगळे ठीक आहेत. आपल्या कामाचं अपयश झाकण्यासाठी काही नेत्यांना असे दावे करावे लागतात.” असा टोला पाचपुतेंनी प्राजक्त तनपुरे (Prajakta Tanpure) यांना लगावला.

एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर पाचपुते यांनी भाष्य केलं. पाचपुते म्हणाले, “राजकारण आहे म्हटल्यावर राजकारणात अशा गोष्टी होत असतात. अशा गोष्टी फारशा मनावर घ्यायच्या नसतात.”

नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीच्या संदर्भात जिल्हा दौरा केला होता. त्यांच्या या दौऱ्यावर पाचपुतेंनी टीकास्त्र सोडलं. अशा प्रकारचे दौरे केवळ दिखाव्यासाठी असतात तसंच पक्षश्रेष्ठींना दाखवण्यासाठी असतात. मुश्रीफांच्या दौऱ्यानं काय सिद्ध झालं? असा सवाल पाचपुतेंनी यावेळी उपस्थित केला.

ही बातमी पण वाचा : एकनाथ खडसेंना भाजपमध्ये पश्चाताप झाल्याने ते राष्ट्रवादीत आले; राष्ट्रवादीचा टोला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER