शाहरुख, सलमानची ‘बाबांच्या’ पार्टीत हजेरी

मुंबई: बाबा सिद्दिकी यांची इफ्तार पार्टी ही नेहमीच चर्चेचा विषय असते. कारण बाॅलिवुडचे अनेक सितारे इथे हजेरी लावतात. यंदासुद्धा सलमान खान इथे आवर्जून हजर होता. यासोबत सलमानची खास मैत्रिण युलिया वेंटूरसुद्धा हजर होती. शाहरुख खानदेखील दरवर्षीप्रमाणे याही वर्षी इफ्तारीला उपस्थित दिसला.


यासोबत सचिन पिळगांवकर आणि स्वप्निल जोशी हे मराठी कलाकार देखील खास हजर होते. याशिवाय कबीर खान, मातिन रे तेंगू ( ट्युबलाईट सिनेमातील बाल कलाकार), हुमा कुरेशी, सोनू सूद, इलियाना डिक्रूज हे बाॅलिवूड कलाकार इफ्तारी साजरी करायला खास उपस्थित होते. तरीही सलमान खान आणि युलिया हेच या पार्टीचा चर्चेचा विषय ठरले.