बा विठ्ठला, कोटी कोटी नमन, एकच प्रार्थना; कोरोनाचे संकट लवकर जाऊ दे… – फडणवीस

Devendra Fadnavis

मुंबई : आज आषाढी एकादशी निमित्त विविध स्तरावरून शुभेच्छा देण्यात येत आहेत. मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सर्वानीच विठ्ठलाकडे कोरोनाला संपवण्यासाठी साकडं घातले आहे. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही विठ्ठलाकडे साकडं घातलं आहे.

॥ मनी विठ्ठल, ठायी विठ्ठल ॥
॥ चित्त विठ्ठल, ध्येय विठ्ठल ॥
बा विठ्ठला, कोटी कोटी नमन अन्
एकच प्रार्थना
कोरोनाचे संकट लवकर जाऊ दे…

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा…!

#जयहरी #आषाढीएकादशी #विठ्ठल_विठ्ठल #विठुमाऊली, असे फडणवीस यांनी म्हणत महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER