…त्यावेळी संभाजी छत्रपतींनी संसदेत तोंड का उघडले नाही? कोळसे-पाटलांचा सवाल

B G kolse-Patil question to Chhatrapati Sambhaji

पुणे : १०२ वी घटनादुरुस्ती करण्यात आली त्यावेळी संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji) संसदेत होते. त्यावेळी त्यांनी तोंड का उघडले नाही? अशी टीका मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी केली. (B. G. kolse-Patil )

राजकीय खेळी
एका वृत्तवाहिनीशी बोलताना कोळसे-पाटील म्हणालेत की, मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण देणं हे सर्वस्वी केंद्र सरकारच्या हातात आहे. राज्यात सध्या मराठा आरक्षणावरून फक्त राजकीय खेळी खेळली जात आहे. संभाजीराजे ज्या मागण्या केल्याचे सांगत आहेत, त्यातून फक्त मराठ्यांच्या नावाने राजकारण केले जाते आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button