करोना काळातील दानामुळे चर्चेत आहेत अझीम प्रेमजी

Azim Premji

करोनाच्या काळात मदतीसाठी उद्योग जगताने मदतीचा हात खुला केला आहे. त्यात विप्रोचे संस्थापक अध्यक्ष दानशूर अझीम प्रेमजी (Azim Premji) सर्वात आघाडीवर आहेत. आपचे माजी नेते आशिष खेतान यांनी याबाबत माहिती दिल्यानंतर गुरुवारपासून सोशल मीडियावर अझीम प्रेमजी ट्रेंड होऊ लागले आहेत. कारण, अझीम प्रेमजी यांनी कोरोना (Corona) काळात रोज २२ कोटी या सरासरीने ७९०४ कोटीचे दान दिल्याची माहिती दिली आहे. नेटीजन्स यासाठी त्यांच्यावर अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

खेतान यांनी दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, २०१९-२० या काळात प्रेमजी यांनी करोना विरुद्धच्या लढाई साठी ७९०४ कोटी दान दिले आहेत. एडलगिव्ह हुरून इंडियाच्या २०२० च्या दाता सूचीमध्ये प्रेमजी अग्रस्थानी आहेत. त्यांच्यानंतर एचसीएलचे शिव नाडर, रिलायंसचे मुकेश अंबानी (Mukesh Ambani) अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत. बिर्ला समूहाचे कुमार मंगलम् बिर्ला चार नंबरवर तर वेदांत ग्रुपचे अनिल अग्रवाल पाच नंबरवर आहेत. दानशुरांच्या या यादीत मुंबईचे ३६, दिल्लीचे २०. बंगलोरचे १० दानशूर आहेत. त्यांनी २०२० मध्ये एकूण १२,०५० कोटी रुपये दान दिले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button