सेरेनाबद्दल विचारताच अझारेंका भडकली

Victoria Azarenka & serena williams

अलीकडेच युएस ओपन टेनिस (US Open Tennis) स्पर्धा गाजविणाऱ्या दोन ‘माता’ खेळाडू, सेरेना विल्यम्स (Serena Williams) व व्हिक्टोरिया अझारेंका (Victoria Azarenka) ह्या फ्रेंच ओपन (French open) स्पर्धेतून एकाच दिवशी बाद झाल्या आहेत. सेरेनाने टाचेच्या दुखण्यामुळे दुसऱ्या फेरीच्या सामन्याआधी माघार घेतली तर व्हिक्टोरिया अझारेंकाला जगातील 161 व्या क्रमांकाच्या अॕना करोलिना श्मिदलोव्हा हिने मात दिली.

सेरेना व अझारेंका यांच्यात यंदाच्या युएस ओपनच्या उपांत्य फेरीत सामना झाला होता. त्यात सेरेना जिंकली होती. सेरेना व अझारेंका यांच्या मैदानावरील प्रतिस्पर्धेची टेनिस जगताला चांगली माहिती आहे. या महिला टेनिस जगतात दीर्घकाळापासून खेळत आलेल्या दिग्गज खेळाडू आहेत आणि युएस ओपनच्या सामन्यावेळीसुध्दा सेरेना टाचेच्या दुखण्याने त्रस्त होती. मात्र त्यावेळी उपांत्य फेरीच्या लढतीतही अझारेंकाने सेरेनाला होत असलेल्या वेदनांकडे फारसे लक्ष दिले नव्हते.

त्यामुळे अझारेंकाला धक्कादायक पराभवानंतर पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने सेरेनाची दुखापत व माघार याबद्दल विचारले पण त्या प्रश्नावर सरळ उत्तर देण्याऐवजी अझारेंका भडकलीच आणि तिने त्या पत्रकारालाच सुनावले.

अझारेंकाने म्हटले की, तुम्हाला काय वाटते की खेळाडू सामन्यादरम्यान प्रतिस्पर्ध्याच्या रुटीनवरच लक्ष ठेवून असतात? व्यावसायिक खेळाडू मैदानावर असताना आपआपल्या मानसिक तयारीत मग्न असतात. त्यांना दुसरीकडे लक्ष द्यायला वेळ कुठे असतो? मी 1-6 अशी पिछाडीवर होते आणि काही गडबड आहे असे मला वाटले नव्हते. आणि मला वाटते की एक खेळाडू दुसऱ्या खेळाडूकडे लक्ष ठेवून असतो असे मला वाटत नाही. आपआपल्या कामाकडेच आमचे लक्ष असते.

अझारेंका पुढे म्हणाली,’ मला माहित नाही आणि मला तिच्याबद्दल बोलायचेसुध्दा नाही. माझा तो विषय नाही म्हणून मी त्याबद्दल बोलणार नाही.’ ती सलग दुसऱ्या वर्षी फ्रेंच ओपनच्या दुसऱ्या फेरीत बाद झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER