आयुष्मान खुराना, सारा अली एकत्र येणार?

Sara Ali Khan - Ayushmann Khurrana

अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) आणि सारा अली खान (Sara Ali Khan) लवकरच एकत्र एका चित्रपटात दिसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आयुष्मान खुरानाने आठ वर्षांपूर्वी ‘विकी डोनर’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये (Bollywood) प्रवेश केला होता. त्यानंतर त्याने ‘दम लगा के हईशा’, ‘बरेली की बर्फी’, ‘शुभमंगल सावधान’, ‘अंधाधुन’, ‘आर्टिकल 15’, ‘बधाई हो’, अमिताभसोबत ‘गुलाबो सिताबो’ असे एकाहून एक सरस चित्रपट त्याने केले आहे. त्याचे चित्रपट हिट होऊ लागल्याने त्याच्याकडे मोठ्या निर्मात्यांची नजर वळली असून मोठ्या नायिकाही त्याच्यासोबत काम करण्यास तयार होत असल्याचे दिसत आहे.

आयुष्मान सध्या ‘चंडीगढ़ करे आशिकी’ चित्रपटात काम करीत आहे. या चित्रपटाचे निर्माते दिनेश विजन यांच्यासोबत आयुष्मान आणखी एका चित्रपटाबाबत बोलणी करीत आहे. हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट असणार असून यात त्याची नायिका म्हणून सारा अली खानला साईन केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. पुढील वर्षी हा चित्रपट सेटवर जाणार असून पुढील वर्षीच तो प्रदर्शित करण्याची योजना आखण्यात आली आहे. सैफची मुलगी सारा अली खानने सुशांत सिंहबरोबर ‘केदारनाथ’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता.

रोहित शेट्टीच्या ‘सिंबा’मध्येही ती दिसली होती. गोविंदाच्या ‘कुली नंबर वन’ची रिमेक डेव्हिड धवन यांनी केली असून यात सारा ही वरुण धवनसोबत दिसणार आहे. याशिवाय दिग्दर्शक आनंद एल. रायच्या ‘अतरंगी रे’चे शूटिंग ती लवकरच सुरू करणार आहे. यात तिच्यासोबत अक्षयकुमार आणि धनुष आहेत. आता ती आयुष्मानची नायिका म्हणूनही पडद्यावर दिसण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER