‘अंतिम’मध्ये आयुष शर्मा एका नव्या रुपात दिसणार

Antim

प्रवीण तरडेचा मराठी सिनेमा मुळशी पॅटर्न बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला होता. या सिनेमाकडे बॉलिवुडमधील अनेक निर्मात्यांचे लक्ष गेले होते. मात्र महेश मांजरेकरने आघाडी घेतली आणि त्याने या सिनेमावर हिंदी सिनेमा बनवण्याची योजना आखून ती सलमान खानला सांगितली. सलमानलाही ती आवडली आणि बहिण अर्पिताच्या नवऱ्याला आयुषला नायक बनवून अंतिम सिनेमाची सुरुवात केली. या सिनेमात सलमान खान इन्स्पेक्टरच्या भूमिकेत दिसणार आहे तर आयुष शर्मा गुंडाच्या भूमिकेत.

या सिनेमातील भूमिकेसाठी आयुष शर्माने स्वतःमध्ये प्रचंड बदल घडवून आणला. यासाठी तो कित्येक तास जिममध्ये घाम गाळत असे. बलदंड व्यक्तिमत्व दिसावे म्हणून तो सलमानसह व्यायाम करीत असे. पहिल्या सिनेमात लव्हर बॉय असलेल्या आयुषचे हे नवे रुप सलमान खानने नुकतेच सोशल मीडियावर शेअर केले आहे. सलमानने सिनेमाचा पहिला टीझर रिलीज करताना आयुषचे हे रुप समोर आणले असून यात आयुष वेगळाच दिसत आहे. आयुषने हेअर स्टाईलपासून सगळेच बदलले असून तो चांगलाच आकर्षक दिसत आहे.

सलमानने आयुषसाठी 2018 मध्ये लवयात्री सिनेमाची निर्मिती केली होती. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर विशेष चालला नव्हता. मात्र आयुषची अॅक्शन हीरो म्हणून इमेज तयार करण्यासाठी सलमानने कंबर कसली आहे. सलमानने ‘अंतिम- द फाइनल ट्रुथ’ चा जो टीझर रिलीज केला आहे त्यात सलमान ख़ान आणि आयुष टॉपलेस दिसत आहे. आयुषने कमवलेली शरीरयष्टी यात दिसून येत आहे. सुरुवातीला आयुष लांबून धावत येताना दिसत असून समोरच्यावर हात उगारताना दिसतो. त्यानंतर स्लो मोशन फ्रेममध्ये सलमान खानची एंट्री होते आणि तो आयुषने मारण्यासाठी उगारलेला हात आपल्या हाताने थांबवतो. या व्हीडियोसोबत सलमानने लिहिले आहे- अंतिम बिगिन्स. हा सिनेमा आयुषला बॉलिवुडमध्ये स्थापित करू शकेल असा विश्वास सलमान खानला वाटत आहे. पुढील वर्षी एप्रिल किंवा मे मध्ये हा सिनेमा प्रदर्शित करण्याची योजना आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER