कोरोनावर उपचारासाठी औषध देण्यास ‘आयुष’ डॉक्टरना मनाई

Ayush Doctor-Supreme Court
  • सुप्रीम कोर्ट : ते फक्त पूरक औषधे देऊ शकतात

नवी दिल्ली: आयुर्वेद, युनानी, सिद्ध, होमिओपथी आणि निसर्गोपचार या उपचारपद्धतींने उपचार करणारे डॉक्टर (AYUSH Doctor) रुग्णाला कोणतेही औषध कोरावरील उपचार म्हणून देऊ शक नाहीत किंवा त्यांचे एखादे औषध कोरोनावर गुणकारी असल्याची जाहिरातही करू शकत नाहीत, असे सर्वोच्च न्यायालयानेही (Supreme Court) मंगळवारी घोषित केले. आंग्लवैद्यक (अ‍ॅलोपथी) सोडून अन्य वैद्यकशाखांचे हे डॉक्टर फार तर कोरोनाची लागण होऊ नये म्हणून रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी रुग्णाला पूरक औषधे देऊ शकतात, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

अशाच प्रकारचा निकाल केरळ उच्च न्यायालयाने ऑगस्ट महिन्यात दिला होता. तो रद्द करून घेण्यासाठी डॉ. एकेबी सद्भावना स्कूल ऑफ होमिओ फार्मसी या संस्थेने अपील केले होते. न्या. अशोक भूषण, न्या. सुभाष रेड्डी व न्या. एम. आर. शहा यांच्या खंडपीठाने ते फेटाळले. कोणी ‘आयुष’ डॉक्टर कोरोनावरील उपचार म्हणून रुग्णांना औषध देताना आढळल्यास त्यांच्यावर आपत्ती निवारण कायद्यानुसार कारवाई करण्याची मुभाही उच्च न्यायालयाने दिली होती. त्यातही हस्तक्षेप करण्यास खंडपीठाने नकार दिला.

उच्च व सर्वोच्च या दोन्ही न्यायालयांनी हा निकाल गेल्या ३ मार्च रोजी केंद्र सररकारच्या ‘आयुष’ मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शिकेच्या आधारे दिला. त्याच अनुषंगाने मंत्रालयाने सर्वोच्च न्यायालयास सांगितले की, कोरोनावर ‘आयुष’ उपचारपद्धतींमध्ये अद्याप तरी कोणतेही हमखास गुणकारी असे औषध नाही. त्यामुळे या डॉक्टरांनी या आजारावर उपचार म्हणून त्यांचे कोणतेही औषधन न देता कोरोनाच्या लक्षणांचा प्रभाव कमी करण्यासाठी व रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी काही औषधे असतील तर ती रुग्णास, तशी स्पष्ट कल्पना देऊन द्यावी, असे त्यांना सांगण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER