आयुर्वेदोक्त पथ्यकर पाककला !

Ayurvedic Dietary

भारताची खाद्यसंस्कृती खूप मोठी आहे. बोलीभाषा आणि खाद्यप्रकार यात वैविध्य आपण अनुभवत असतो. आयुर्वेदात (Ayurveda) आहार हा शरीराचा एक उपस्तंभच मानला आहे. त्यामुळे आयुर्वेदात आहार हा खूप महत्त्वाचा विषय आहे. स्वस्थ व्यक्तींकरीता आहार विचार व आजारी व्यक्तीकरीता त्या त्या आजारानुसार पाककला आयुर्वेदात सांगितल्या आहेत.

आहाराचे महत्त्व सांगतांना काश्यप ऋषी म्हणतात.

न च आहारसमं किञ्चित् भैषज्यं उपलभ्यते ।
शक्यतेsप्यन्नमात्रेण नरः कर्तुं निरामयः ॥

आहारासमान अन्य कोणतेच औषध नाही. केवळ अन्नाव्दारे (अर्थात पथ्यकर अन्न) मनुष्याला निरोगी करू शकतो. म्हणूनच आहाराला महाभैषज्य म्हणजेच सर्वात श्रेष्ठ औषध मानले आहे. केवळ औषधी घेऊन माणूस जगू नाही शकत. जीवन जगण्याकरीता आहारच अत्यंत आवश्यक आहे.

आजारात वा नंतर अशक्तपणा दूर होण्याकरीता, चव येण्याकरीता व हळुहळू शरीर पूर्वपदावर येण्याकरीता काही आहार संकल्पना सांगितल्या आहेत. एखादेवेळी स्वस्थ व्यक्तीसुद्धा जड जेवण झाले असेल, अजीर्ण अपचन वाटत असेल तर या पथ्य आहाराचा समावेश करू शकतात. जेणेकरून औषध न घेता आहाराने चिकित्सा शक्य होते. बघूया काही पथ्यकर पाककृती –

cardamom rice pudding recipe

१) मण्ड – तांदूळ स्वच्छ करून त्यात १४ पट पाणी टाकून तांदूळ शिजेस्तोवर उकळतात. शिजल्यावर त्याचे फक्त पाणी म्हणजे मण्ड. यात भाताचे कण मुळीच नसतात. यात चवीला सुंठ सैंधव घालू शकतो. पंचकर्म चिकित्से नंतर हे देतात. तसेच वात कमी करणारे आहे. घसा कोरडे पडणे, सतत तहान लागणे, ग्लानि पाचनविकार दूर करणारे आहे. यामुळे घाम येऊन ज्वर कमी होतो. जठराग्नि वृद्धिंगत होते.

२) पेया – वरील प्रमाणेच कृती परंतु यात भाताचे थोडे अंश असतात. ही पाककृती देखील पिण्यायोग्यच असते. या दोन्ही पाककृती, ताप कणकण जाणवत असेल तर सुरवातीला १-२ दिवस घेतल्यास ताप वाढत नाही तसेच उपद्रव निर्माण होत नाही. याला लंघन उपाय म्हणून घेऊ शकतो.

ही बातमी पण वाचा : जेवणाचे नियम व वाढण्याच्या पद्धती- आयुर्वेद दृष्टीने

साळीच्या लाह्या, यव ( जौ / barley) वापरुनही ही पाककृती करू शकतो. लाह्यांची पेया अशक्तपणा दूर करणारी, डीहायड्रेशन दूर करणारी आहे. त्यामुळे ज्वर, अतिसार अशा व्याधींमधे उत्तम पथ्याहार आहे.

३)अष्टगुण मण्ड – धणे, सुंठ मिरे पिंपळी, सैंधव घालून मूग तांदूळ वापरून उपरोक्त प्रमाणे १४ पट पाण्यात शिजविलेले हे मण्ड याला तेलात हिंगाची फोडणी देतात. याचे 8 गुण आहेत म्हणून याला अष्टगुण मण्ड म्हणतात. जठराग्निवृद्धी करणारे, बल देणारे, ब्लॅडर शुद्ध करणारे, रक्तवर्धक, ज्वरहर, वात – पित्त – कफशामक आहे.

brussels sprouts detox soup recipe४) यूष, सूप – मूग इ. धान्यडाळी भाजून यात १४ किंवा १८ पट पाणी टाकून अर्धा भाग उरेल एवढे उकळणे म्हणजे यूष. यात फक्त डाळींचे कढण ( पाणी) घेतले जाते. सूप म्हणजे डाळीसकट पाणी. हे पुन्हा २ प्रकारे करता येते. सैधवमीठ काळे मिरे तूप जीरे अशी फोडणी देऊन यालाच आयुर्वेदात कृतयूष म्हणतात व दुसरा प्रकार म्हणजे तूप मसाल्यांचा वापर न करता फक्त कढण स्वरूपात घेणे.

यूष रुचिकारक, भूक वाढविणारे, स्वर वर्ण बल अग्नि चांगला करणारे, पाचन करणारे, तुष्ट पुष्ट करणारे, घाम आणणारे (अंगातील उष्णता स्वेदा व्दारे बाहेर काढणारी) आहे. गरम स्वरूपात घेतल्यामुळे वात पित्त कफ शांत करणारे आहे. जे द्रव्य वापरतो त्यानुसार यूष / सूप गुण बदलतात. सर्वात श्रेष्ठ मूगाचे यूष आहे.

५) विलेपी – तांदूळ भाजल्यावर चार पट पाणी टाकून शिजविणे म्हणजे विलेपी. यालाच लापशी सुद्धा म्हणू शकतो. ही ताकद देणारी, हृद्य, स्वादिष्ट, पित्त कमी करणारी आहे.

पुढील लेखात अशाच काही पाककृती बघूया

ayurveda

 

 

 

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER