कोरोनाच्या आयुर्वेदिक औषधासाठी लोकांची रांग; निःशुल्क वाटप !

Maharashtra Today

हैदराबाद : कोरोनाच्या(Corona) साथीमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ते कोरोनावरच्या औषधाच्या शोधात आहेत. आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातील एका गावात वैद्य आनंदैया हे कोरोनाचे औषध निःशुल्क वाटत (Free herbal covid 19 treatment) आहेत. हे औषध घेण्यासाठी लोकांच्या रांगा लागत आहेत.

याबाबतची माहिती सोशल मीडियावर (Social media) व्हायरल झाल्यानंतर गावात औषध घेण्यासाठी गर्दी उसळली आहे. यात केवळ आंध्र प्रदेशमधील रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक नाही तर इतर राज्यातील लोकही येत आहेत. काही रुग्ण तर रुग्णवाहिकेतून येत आहेत! गंभीर अवस्थेतील रुग्णांची लोक हे औषध देत आहेत! आयुर्वेदिक औषधाने(Ayurvedic cure) कोरोना बरा होतो, याचा कुठलाही वैज्ञानिक पुरावा अजून मिळालेला नाही.

या औषधाचे २ थेंब डोळ्यात टाकल्यानंतर शरीरातील ऑक्सिजन पातळी ८३ वरून ९५ होते, असा दावा करण्यात आला आहे. हे औषध तीन प्रकारात आहे. कोरोना होऊ नये (प्रतिबंधक), झाल्यास तो बरा करणारे आणि ऑक्सिजन पातळी वाढविणारे , अशी माहिती आनंदय्या यांनी दिली शिवाय या औषधांसाठी पोलिसांना या औषधांचे वितरण थांबवले आहे. औषधांची चाचणी झाल्यानंतर वाटप करा, असे  सांगितलं.

याप्रकरणी लोकयुक्तांकडे देखील तक्रार करण्यात आली आहे. मात्र, हे औषध घेतल्यानंतर एकाही रूग्णाने तक्रार केलेली नाही.  आंध्रचे मुख्यमंत्री वाय.एस जगनमोहन रेड्डी म्हणाले की, ‘औषधांच्या वापरास प्रोत्साहन देण्याचा विचार करत आहोत. त्यासाठी अधिकाऱ्यांनी औषधांचे वितरण आणि इतर पूरक बाबींसाठी अभ्यास करून योग्य पावले टाकावीत, असे आदेश देण्यात आले आहेत.’

उपराष्ट्रपती व्यंकय्य नायडू यांनी देखील या प्रकरणाची दखल घेतली आहे. ‘आयुष मंत्रालयाचे हंगामी मंत्री किरण रिजीजू आणि आयसीएमआर महासंचालक बलराम भार्गव यांच्यासोबत याविषयी चर्चा केली. औषधांचा अभ्यास करून योग्य निर्णय घेऊ’ असे ते म्हणालेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button