जागतिक परिचारिका दिन निमित्ताने आयुर्वेदोक्त परिचारक गुण !

International Nurses Day

१२ मे जागतिक परिचारिका दिन (International Nurses Day) म्हणून साजरा केला जातो. परिचारिका यांना सिस्टर आणि ब्रदर म्हटले जाते. या शब्दांतच किती प्रेम आदर आणि आपुलकीची भावना दडली आहे. कोविड योद्धा म्हणून गेल्या वर्षापासून रात्रंदिवस डॉक्टर काम करताय तेवढ्याच स्तरावर सर्व हॉस्पीटलमधील परिचारिका देखील घरदार विसरून पेशंटला वाचविण्यात शर्थीचे प्रयत्न करताय. कोविड काळात कितीतरी कठीण प्रसंगाना सामोरे जावे लागत आहे. आपल्याला संसर्ग होऊ शकतो हे माहित असूनही पेशंटला औषध देणे, पेशंटला धीर देणे, डॉक्टर्सच्या सूचनांचे पालन करणे अशी अनेक कामे परिचारिका हिमतीने करताहेत. परिचारिकांना आयुर्वेद शास्त्रात देखील चिकित्सा चतुष्पादमधील एक भाग मानला आहे. चिकित्सेचे चार विभाग खूप महत्त्वाचे आहेत. याशिवाय व्याधीची चिकित्सा गतिशील, सफल होऊ शकत नाही. यातील एक घटक जरी डळमळीत झाला तर चिकित्सा यशस्वी होऊ शकत नाही.

वैद्य ( डॉक्टर), औषध, परिचारक, रुग्ण या ४ गोष्टी योग्य तसेच गुणवान असल्यास चिकित्सा कर्म यशस्वी होते. योग्य परिचारक कसा असावा त्याचे गुण काय याबद्दलही आयुर्वेदात वर्णन केले आहे.

अनुरक्तः शुचिः दक्षो बुद्धिमान् परिचारकः ।

परिचारक यालाच उपस्थाता ( उप समीपे तिष्ठातीति) म्हटले आहे. जो रुग्णाजवळ राहून त्याची देखभाल करतो तो उपस्थाता! परिचारक हा अनुरक्त म्हणजेच रुग्णाबद्दल स्नेह ठेवणारा त्याची देखभाल प्रेमाने करणारा असावा. शुचि म्हणजेच स्वच्छ असणारा व औषध खानपान यात स्वच्छता ठेवणारा असावा. दक्ष म्हणजेच आपल्या कार्यात कुशल असणारा, बुद्धिमान म्हणजेच प्रसंगावधान, सूचनांचे योग्य पालन, सावध असावा. किती योग्य गुणवर्णन फक्त ४ शब्दात केले आहे आयुर्वेदात.

असे हे परिचारक चिकित्सेचा, स्वास्थ्यविभागाचा महत्त्वाचा घटक. त्यांच्या अविरतपणे सुरु असलेल्या सेवाभावी कार्याला सलाम!

ayurveda

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button