आयुर्वेद पंचकर्म चिकित्सा – बस्तिकर्म

Bastikarma

मागील २ लेखात वमन विरेचन या पंचकर्माबद्दल आपण माहिती घेतली. या लेखात बस्ति या पंचकर्मा बद्दल थोडी माहिती घेऊया –

वातहराणां श्रेष्ठ ! वातदोषाची श्रेष्ठ चिकित्सा म्हणजे बस्ति पंचकर्म. सर्व प्रकारच्या वातव्याधींवर बस्ति फायदेशीर ठरते.

बस्ति म्हणजे एनिमा नव्हे. यात औषधी काढे, औषधीसिद्ध तेल तूप यांचा वापर करून गुदमार्गाने औषधी दिल्या जातात व दोषांचे निर्हरण किंवा व्याधीची चिकित्सा केली जाते.

स्त्रियांमधे गर्भाशय विकार वंध्यत्त्व बीज विकारांमधे योनी द्वारातून बस्ति दिली जाते त्याला उत्तर बस्ति म्हणतात.

स्वस्थ व्यक्ती घेऊ शकतो का?
हो. ऋतुनुसार स्वस्थ राहण्याकरीता पंचकर्म चिकित्सेचा अवलंब करण्यास आयुर्वेद (Ayurveda) शास्त्रात सांगितले आहे. त्यानुसार वर्षा ऋतु दरम्यान शरीरात वात वाढतो वात विकार बळावतात म्हणून स्वस्थ व्यक्तीने याकाळात बस्ति पंचकर्म करावे. किमान वर्षातून एकदा वर्षा ऋतुच्या सुरवातीला बस्ति चिकित्सा घ्यावी.

बस्ति किती दिवस घ्यावी लागते?
आजाराचे स्वरूप, तीव्रता, लक्षण यानुसार बस्ति संख्या बदलते. उदा. अगदी 3 बस्ति पासून 30 बस्ति पर्यंत देता येते.

कोणत्या व्याधीकरीता बस्ति घ्यावी?
बस्ति ही अर्धी चिकित्सा सांगितली आहे. त्यामुळे सर्वच व्याधींवर युक्तीने बस्ति देता येते. स्त्रीरोग, कष्टार्तव, अनार्तव, बाळ न राहणे, PCOD, शुक्रदोष, संधीवात, कटीशूल, शिरः ते पाय सर्वच अवयवांच्या तक्रारींवर औषधे बदलून बस्ति देता येते.

बस्तिमधे काही पथ्य असते का ?

  • बस्ति मधे आहार विहाराचे पथ्य पालन आवश्यक आहे. जेणेकरून त्याचा योग्य फायदा शरीराला व्हावा.
  • बस्ति पंचकर्म वैद्याच्या सल्ल्यानेच घ्यावी. वय प्रकृती आजाराचे स्वरूप यानुसार मात्रा, संख्या, प्रमाण, घटकद्रव्ये बदलतात त्यामुळे आयुर्वेद चिकित्सकाचा सल्ला व देखरेख गरजेची ठरते.
  • या चिकित्सेचे फायदे इतके जास्त आहेत की नक्कीच याचा अवलंब करावा.

ह्या बातम्या पण वाचा :

ayurveda

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER