कोविडच्या सौम्य ते मध्यम लक्षणात आयुर्वेद औषधे प्रभावी

COVID-19 - AIIA - Ayurveda Drugs

नवी दिल्ली : कोविड – १९ च्या (COVID-19) सौम्य व मध्यम लक्षणात आयुष काढा आणि फिफाट्रोल (Fifatrol) या आयुर्वेदिक गोळ्या प्रभावी आहेत, अशी माहिती येथील एआयआयएच्या (ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद) (AIIA) डॉक्टरांनी दिली. एआयआयएच्या मासिकात माहिती देण्यात आली आहे की, संशमनीवटी, फिफाट्रोल आणि लक्ष्मीविलास रस याने रुग्णाची फक्त तब्येत सुधारत नाही तर सहा दिवसांत त्याची चाचणी निएटिव्ह येते.

एका ३० वर्षांच्या आरोग्य कर्मचाऱ्याची माहिती देताना म्हटले आहे की, तो संशमनीवटीच्या उपचाराने बरा झाला. सोबत त्याला फिफाट्रोल गोळ्या आणि आणि लक्ष्मीविलास रस, आयुष्य काढाही देण्यात आला होता. सध्या कोविड – १९ वर कोणताही निश्चित इलाज नाही. ४४.७ दशलक्ष लोक याचे रुग्ण आहेत. १. १७ दशलक्ष रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER