आयुर्वेद – ऍलोपॅथी वाद : आयएमएचे रामदेव बाबांना खुल्या चर्चेचे आव्हान

दिल्ली : कोरोनावरून (Corona virus) रामदेव बाबांनी (Ramdev Baba) उकरून कडलेल्या वादात उत्तराखंड आयएमएने  (IMA) रामदेव बाबांनाच खुल्या चर्चेचे आव्हान दिले आहे. रामदेव बाबांनी डॉक्टरांना उद्देशून २५ प्रश्नांची यादीच जाहीर केली होती. त्यानंतर उत्तराखंड आयएमएकडून हे आव्हान देण्यात आले आहे.

रामदेव बाबा यांनी ऍलोपॅथी आणि डॉक्टरांबाबत केलेल्या विधानासाठी माफी मागावी, अशी मागणी करत आयएमएने केंद्र सरकारला पत्र लिहिण्यासोबतच रामदेव बाबा यांच्याविरोधात गुन्हा देखील दाखल केला आहे. आयएमएच्या केंद्रीय मंडळाकडून रामदेव बाबांनी त्यांचे वक्तव्य पूर्णपणे मागे घेण्याची मागणी केली आहे.

काही दिवसांपूर्वी रामदेव बाबांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये त्यांनी करोनाच्या दोन्ही लसी घेतल्यानंतर देखील एक हजार डॉक्टर मेल्याचा दावा केला होता. “जे स्वत:ला वाचवू शकत नाहीत, ते कसले डॉक्टर?” असा सवाल देखील त्यांनी विचारला होता.

या व्हिडिओनंतर मोठ्या प्रमाणावर रामदेव बाबांवर टीका होऊ लागली. नंतर त्यांचा अजून एक व्हिडिओ व्हायरल झाला. यामध्ये, “लोक कधीकधी रामदेवबाबा यांना अटक करण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर चालवतात तर कधी रामदेवबाबा ठग असल्याचे ट्रेंड चालवतात. चालू द्या, पण आता आपण हे गुण देखील शिकलो आहोत आणि आम्ही जे लोक जो ट्रेंड चालवितो तो देखील शीर्षस्थानी असतो. अटक तर त्यांचा बाप सुद्धा करू शकत नाही”, असे रामदेव बाबा म्हणाले होते.

या मुळे संतप्त झालेल्या डॉक्टरांच्या शीर्ष संघटना आयएमएने रामदेव बाबांना १ हजार कोटींची नोटीस पाठवली. तसेच, विधानाबद्दल माफी देखील मागण्यास सांगितले. इतक्यावरच न थांबता, आयएमएनं योगगुरू रामदेवबाबा यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची देखील मागणी करणारे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिले आहे.

दरम्यान, रामदेव बाबांविरोधात दाखल केलेल्या तक्रारीविषयी बोलताना आयएमएचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. जी. ए. जयलाल म्हणालेत – आमचे रामदेव बाबांशी वैर नाही. रामदेव बाबा त्यांचं विधान पूर्णपण माघारी घेणार असतील, तर आम्ही आमची तक्रार मागे घेऊ. आम्हाला वाटते की त्यांची वक्तव्य लोकांमध्ये संभ्रम निर्माण करू शकतात. त्यांचे खूप सारे अनुयायी असल्यामुळे आम्हाला ही भीती वाटते.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button