अयोध्याप्रकरणी शाहरुखला मध्यस्थी नेमायचे होते! ; मावळते सरन्यायाधीश शरद बोबडेंचे गुपित उघड

Maharashtra Today

मुंबई : नोव्हेंबर २०१९ मध्ये देशाचे ४७ वे सरन्यायाधीश म्हणून शरद बोबडे यांनी शपथ घेतली होती. ते शुक्रवारी सेवेतून निवृत्त झाले. त्यांनी आपल्या कारकिर्दीत ऐतिहासिक राम जन्मभूमी प्रकरणाचा निकालासह अनेक महत्त्वाचे निकाल दिले. त्यांच्या कारकिर्दीतील काही गुपित निरोप समारंभातून उघडकीस आले आहे .

अयोध्याप्रकरणी तोडगा ( ayodhya dispute ) काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे मावळते सरन्यायाधीश शरद बोबडे ( cji sharad bobde ) हे बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानला ( shahrukh khan ) मध्यस्थी नेमण्याच्या विचार होते. शरद बोबडे यांच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमात ही माहिती उघडकीस आली आहे .

अभिनेता शाहरुख खाननेही अयोध्याप्रकरणी तोडगा काढण्याच्या प्रक्रियेचा भाग व्हावं, अशी शरद बोबडे यांची इच्छा होती. सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष आणि वरिष्ठ वकील विक्रम सिंह हे मावळते सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या निरोपाच्या समारंभात बोलत असताना हे गुपित उघड झालं. अयोध्याप्रकरणी मध्यस्थीसाठी तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने मार्च २०१९ मध्ये समिती नेमली होती.

अभिनेता शाहरुख खानही यासाठी तयार होता. पण ही प्रक्रिया पुढे जाऊ शकली नाही. अयोध्या प्रकरणावर मध्यस्थाच्या माध्यमातून तोडगा निघू शकतो, असे या प्रकरणी सुनावणीच्या सुरवातीच्या टप्प्यात न्यायमूर्ती बोबडे यांना वाटत होत, अशी माहिती सिंह यांनी दिली.

मंदिराची पायाभरणी ही मुस्लिमांद्वारे केली जावी आणि मशिदीची पायाभरणी हिंदूंकडून. पण मध्यस्थीची प्रक्रिया फिस्कटली आणि ही योजना मध्येच सोडून द्यावी लागली, असं सिंह यांनी सांगितलं. मध्यस्थी करणाऱ्या समितीत सोर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती एफएमआय कलीफुल्ला, आर्ट ऑफ लिविंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर आणि वरिष्ठ वकील श्रीराम पंचू यांचा समावेश होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button