राम मंदिर भूमिपूजन ; १८० लोकांना निमंत्रण ; भागवत यांच्यासह आरएसएसच्या ११ नेत्यांचे नावेही चर्चेत

Ram Temple- Mohan Bhagwat

मुंबई :- पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते ५ ऑगस्ट रोजी अयोध्येत राम मंदिराचं भूमिपूजन (Ram Mandir bhoomi poojan) करण्यात येणार आहे. दरम्यान, भूमिपूजनाची तयारीदेखील सुरू करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भूमिपूजनाच्या या कार्यक्रमासाठी १८० लोकांना निमंत्रित करण्यात आले आहे . यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याव्यतिरिक्त सरसंघचालक मोहन भागवत (Mohan bhagwat), भाजपा नेत्या उमा भारती (Uma Bharati), अवधेशानंद सरस्वती, साध्वी ऋतंभरा, रामभद्राचार्य, इकबाल अन्सारी, कल्याण सिंह, विनय कटियार यांनादेखील भूमिपूजनासाठी निमंत्रण देण्यात आलं आहे. आजतकने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

आरएसएसचे शीर्ष 11 नेता ज्यात मोहन भागवत याच्याव्यतिरित भैया जी जोशी, कृष्ण गोपाल, दत्तात्रेय होसबोले आणि लखनऊ क्षेत्र प्रचारक अनिल कुमार याचा सहभाग आहे. याव्यतिरिक्त विश्व हिंदू परिषदचे अंतरराष्ट्रीय महासचिव आलोक कुमार यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे .

दरम्यान, भूमिपूजनाच्या कार्यक्रमला कोणतेही केंद्रीय मंत्री सहभागी होण्याचं चिन्ह कमी आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. परंतु आता ते येणार नसल्याचं म्हटलं जात आहे. तर वयापरत्वे आणि करोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी हेदेखील अयोध्येत येण्याची शक्यता नसल्याचे सांगण्यात येत आहे. याव्यतिरिक्त कोणत्याही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना या कार्यक्रमात सहभागी होण्याचं निमंत्रण देण्यात आलेलं नाही. तसंच कोणतेही उद्योगपती या कार्यक्रमात सामिल होणार नाहीत. परंतु सर्व धर्मांच्या प्रतिनिधींना मात्र या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यात आले आहे.

ह्या बातम्या पण वाचा : 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER