आयत्या बिळावर नागोबा !’ भाजपची मुख्यमंत्र्यांवर टीका

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्यावतीने मुंबईच्या पश्चिम उपनगरात मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ उभारण्यात आली असून, भविष्यात या दोन्ही मार्गांवर धावणाऱ्या मेट्रोची चाचणी सोमवारी दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thakeray) यांच्या प्रमुख उपस्थितीत आकुर्ली मेट्रो स्थानकावर पार पडली.

दरम्यान यावरून भाजपने मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडले. आयत्या बिळावर नागोबा. अहंकारापोटी मेट्रो प्रकल्पाचा खुळखुळा करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या फुकटेपणाचा धिक्कार करतो, अशा शब्दात भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडले. तसेच अहंकार आणि बालहट्टापायी लाखो मुंबईकरांचे स्वप्न असलेल्या मुंबई मेट्रोचा बट्ट्याबोळ करून फुकटचे श्रेय घेण्यासाठी धडपडणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध आज आम्ही तीव्र आंदोलन केले. आकुर्ली मेट्रो स्थानकाबाहेर पोलिसांनी आम्हाला अटक केली. चमको मुख्यमंत्र्यांचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो, असेही भातखळकर म्हणाले आहेत.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही. 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button