पुणे-सातारा महामार्ग कामाच्या दिरंगाईला अ‍ॅक्सिस बॅंक दोषी- नितीन गडकरी

पुणे :- पुणे- सातारा महामार्गाच्या (Pune-Satara highway work) कामाला दिरंगाई झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी अ‍ॅक्सिस बॅंकेला (Axis Bank) दोषी मानले आहे. या बॅंकेवर कारवाई करण्याचे पत्रही त्यांनी पुण्याचे ग्रामीण पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले आहे, असे स्पष्ट शब्दात नमूद केले आहे.

आज नितीन गडकरी यांनी पुण्यातील चांदणी चौक उड्डाण पुलाच्या कामाचा आढावा घेतला. शहरात होणारे उड्डाणपूल आणि हायवे या संदर्भातही उत्तरे त्यांनी दिली. जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी सातारा रस्त्यावर होणाऱ्या अपघातांबाबत उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. गडकरींनी या सगळ्यांसाठी आवश्यक उपाययोजना सुचवल्या आहेत आणि अंमलबजावणी तातडीने करण्याचे आदेश दिले आहे.

नितीन गडकरी यांनी या कामातल्या दिरंगाईला अ‍ॅक्सिस बॅंक जबाबदार असल्याचे सांगितले आहे. सातारा हायवेसाठी अ‍ॅक्सिस बॅंकेकडे कंत्राट दिले होते. टोलची संपूर्ण रक्कम बँकेकडे जमा ठेवायचे. ती रक्कम कंत्राटदाराला दिलीच नाही. यामुळे सगळ्या कामाला दिरंगाई झाली आहे. बॅंकेवर कारवाई केली जाणार तरी कंत्राटदार असणाऱ्या रिलायन्सचे काय? याबाबत विचारले असता कारवाई केल्यावर त्यात दिरंगाई होते. कारवाई न करता कामाकडे लक्ष असल्याचेही गडकरी यावेळी म्हणाले. या रस्त्यावर चार पुलांचे काम सुरू आहे आणि सातारा रस्त्याचे काम मार्चअखेर पूर्ण होईल, असा दावाही त्यांनी केला.

गडकरी यांना रस्त्याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, रस्ता आहे तर टोल भरावाच लागेल. चंद्रकांत पाटलांसारखी टोलमुक्ती आम्ही दोणार नाही. त्या कंत्राटदारांना अजूनही पैसे मिळाले नाहीतर काम कसे पूर्ण होणार, असेही गडकरी म्हणाले. एकूणच तारीख पे तारीखमध्ये अडकलेल्या सातारा हायवेच्या कामाला आता अजून एक नवी तारीख मिळाली आहे. आता या नव्या मुदतीत तरी काम पूर्ण होणार का पाहावे लागेल, असेही यावेळी गडकरींनी स्पष्ट केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER