आव्हाडांचं विधान म्हणजे राजेंद्र यड्रावकर यांचे अवमूल्यन, प्रवीण दरेकरांचा पलटवार

jitendra Awhad - Parvin darekar - Maharastra Today

मुंबई : फोन टॅपिंग प्रकरणात ठाकरे सरकारच्या रडारवर आलेल्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या बचावासाठी आता भाजपचे नेते मैदानात उतरले आहेत. राज्य सरकार चौकशीची भाषा करुन रश्मी शुक्ला यांच्यावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारला चौकशीची इतकी घाई कशाला? सरकारने आधी पोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेटची चौकशी करावी. त्या चौकशीत रश्मी शुक्ला यांची चूक असेल तर ती उघड होईल येईल, अशी प्रतिक्रिया विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी.

ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी प्रवीण दरेकर यांनी रश्मी शुक्ला यांची अप्रत्यक्षपणे बाजू घेतली. रश्मी शुक्ला यांनी अपक्ष आमदार राजेंद्र यड्रावकर यांना भाजपमध्ये येण्यासाठी धमकी दिल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला. मात्र, मला आव्हाडांचं विधान म्हणजे राजेंद्र यड्रावकर यांचे अवमूल्यन करण्यासारखे वाटते. कुठलाही आमदार नेता अशाप्रकारे धमकीला घाबरत नाही. एवढा कमजोर लोकप्रतिनिधी नसतो. त्यामुळे जितेंद्र आव्हाडांच्या बोलण्यात तथ्य वाटत नसल्याचे, प्रवीण दरेकर म्हणाले.

फोन टॅपिंग प्रकरणात चौकशी न करताच निष्कर्ष काढणे चूक आहे, रश्मी शुक्ला यांनी कोणती नियमबाह्य गोष्ट केलेली नसावी, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यासंदर्भातली तक्रार देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. या चौकशीला तुमचा पाठिंबा असेल तर होऊ द्यावी. त्या चौकशीत रश्मी शुक्ला यांची चूक असेल तर ते निष्पन्न होईल ते आम्ही मान्य करू. पण चौकशी करायच्या अगोदरच निष्कर्षापर्यंत येणार असाल तर अत्यंत घाईचं आणि चुकीचं ठरेल, असे मत प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER