शपथविधीसाठी सरपंचाची चक्क हेलिकाॅप्टरमधून ‘एन्ट्री’ !

Sarpanch's entry from the helicopter for the swearing-in ceremony

अहमदनगर :- संगमनेर तालुक्यातील आंबी दुमाला गावात अनोख्या पद्धतीने शपथविधी सोहळा झाला. शपथविधी घेण्यासाठी सरपंचाने  थेट हेलिकॉप्टरमधून एन्ट्री केली. सरपंचाचे आगमन जल्लोषात करण्यात आले. त्यानंतर १२ बैलांच्या बैलगाडीतून त्यांची मिरवणूकसुद्धा काढण्यात आली.

या सरपंचाचे नाव जालिंदर गागरे असे आहे. जालिंदर यांच्या पुणे येथे विविध कंपन्या आहेत. गावातील शेकडो तरुणांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला. व्यवसायानिमित्त पुण्यात राहात असले तरी त्यांची नाळ गावाशी जुळलेली आहे.

जालिंदर गागरे यांनी गावाचा विकास करण्यासाठी निवडणूक   लढवली आणि ९ पैकी ९ जागा जिंकून ते बहुमतांनी विजयी झाले. योगायोगाने सरपंचपदाचे आरक्षण सर्वसाधारण पुरुषाचे निघाल्याने ते सरपंच झाले. आज मंत्री, मुख्यमंत्र्यांप्रमाणेच ग्रामपंचायत सदस्य, सरपंच आणि उपसरपंच यांनी गावाच्या विकासाची शपथ घेतली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER