IPL मध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाजीचा मिळाला पुरस्कार, “या” यॉर्कर स्पेशलिस्टला मिळाली टीम इंडियामध्ये संधी

T. Natarajan

ऑस्ट्रेलियाच्या या दौर्‍यासाठी भारतीय संघात बदल करण्यात आले आहेत. IPL मध्ये चमकदार कामगिरी करणारा कोलकाता नाइट रायडर्सचा लेगस्पिनर वरुण चक्रवर्ती खांद्याच्या दुखापतीमुळे टी -२० मालिकेपासून दूर झाला आहे. वरुण चक्रवर्तीच्या जागी सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज आणि यॉर्कर स्पेशलिस्ट टी. नटराजनला टी -२० संघात स्थान देण्यात आले आहे.

रहस्यमय फिरकीपटू वरुण चक्रवर्तीला टी -२० संघातून वगळल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे. वरुणने खांद्यावर दुखापत लपवून ठेवल्याची माहिती आहे. टी. नटराजनला आता वरुण चक्रवर्तीच्या जागी टीम इंडियामध्ये संधी मिळाली आहे. IPL २०२० मध्ये वेगवान गोलंदाज टी. नटराजनने डेथ ओव्हर्समधील त्याच्या शानदार गोलंदाजीने प्रभावित केले आहे. त्याने संपूर्ण स्पर्धेत बरीच गोलंदाजी केली आहे.

हैदराबादच्या या वेगवान गोलंदाजाने यंदा IPL मध्ये १६ सामन्यांत १६ गडी बाद केले. डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी केल्यानंतरही त्याचा इकोनॉमी रेट ८.०२ चा होता.

भारतीय कर्णधार विराट कोहलीला BCCI ने सोमवारी पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटीनंतर पितृत्व रजा घेण्यास मान्यता दिली जेव्हाकी मर्यादित षटकांच्या संघाचा उपकर्णधार रोहित शर्माला पायाच्या स्नायूच्या ताणमुळे सुरुवातीला कसोटी संघात स्थान न मिळाल्याने आता संघात स्थान देण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER