दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीत आलेल्या आवळेंचा पक्षातूनच विरोध

NCP - Rajiv Awale

कोल्हापूर : दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीत आलेले माजी आमदार राजीव आवळे (Rajiv Awale) यांचा राष्ट्रवादीतूनच विरोध होताना दिसत आहे. कोल्हापुरात हातकणंगले तालुक्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या (NCP) नेत्याने राजीव आवळे यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली आहे.

विधानसभा निवडणुकांच्या वेळी उडालेल्या ठिणग्यांचं उत्तर विरोधानं  दिलं जात आहे. हातकणंगले तालुक्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष लखन बेनाडी यांनी आवळेंना विरोध केला आहे. राजू आवळे यांनी विधानसभा निवडणुकांच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसला विरोध केला होता. याच अनुषंगाने निष्ठावंत कार्यकर्त्यांनी त्यांच्या पक्षप्रवेशानंतर आडकाठी केली आहे.

पक्षश्रेष्ठींनी याचा विचार करावा, नाही तर आम्हाला दुसरा विचार करावा लागेल, असा इशारा लखन बेनाडे यांनी दिला आहे. हातकणंगले तालुक्यामध्ये लखन बेनाडे यांची मोठी ताकद आहे. त्यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी घरावर तुळशीपत्र ठेवून पडत्या काळामध्ये राष्ट्रवादीला उभारी दिली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER